टीम इंडियाला (Team India) 12 जुलैपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर (India Tour West Indies) जायचे आहे. जिथे त्यांना कसोटी (Test), टी-20 (T20I) आणि एकदिवसीय मालिका (ODI Series) खेळायची आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) या दौऱ्यातून बाहेर असू शकतो. रोहितवर कामाचा ताण हे यामागे मोठे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे, कारण जेव्हापासून कर्णधार रोहितने तिन्ही फॉरमॅटची जबाबदारी स्वीकारली, तेव्हापासून त्याच्यावर कामाचा ताण वाढला आहे. (हे देखील वाचा: IND vs PAK Asia Cup 2023: आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान तीन वेळा येवु शकतात आमने-सामने, जाणून घ्या समीकरण)
रोहित शर्मा वेस्ट इंडिज दौऱ्यातून का जाऊ शकतो बाहेर
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, आयपीएल आणि इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये रोहित थोडा थकलेला दिसत होता. वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी त्याने काही काळ विश्रांती घ्यावी, अशी निवडकर्त्यांची इच्छा आहे. तो कसोटी किंवा आठ सामन्यांच्या पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेतून (तीन वनडे आणि पाच टी-20 आंतरराष्ट्रीय) बाहेर जाण्याची शक्यता आहे. निवडकर्ते रोहितशी बोलून त्यानंतर निर्णय घेतील.
#RohitSharma to be rested for part of West Indies tour?
Read: https://t.co/kQrkWBxGj6 #WIvIND #TeamIndia #BCCI pic.twitter.com/vah0RYnBRB
— TOI Sports (@toisports) June 16, 2023
रोहित शर्माचा फॉर्म घसरला
कामाचा ताण वाढल्यामुळे रोहित शर्माचा फॉर्म घसरला आहे. 2023 मध्ये, त्याने न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत शतक झळकावले. तेव्हापासून रोहित फॉर्मशी झगडत आहे. आयपीएल 2023 मध्येही रोहितची बॅट शांत होती, त्याने 16 सामन्यांमध्ये केवळ 332 धावा केल्या होत्या.
रहाणेकडे दिले जाऊ शकते कर्णधारपद
जर रोहित शर्मा वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला नाही तर अजिंक्य रहाणे कसोटीत त्याचे कर्णधारपद भूषवू शकतो, तर हार्दिक पांड्या वनडे आणि टी-20मध्ये कर्णधार होऊ शकतो. या दौऱ्यानंतर रोहितला थेट आशिया कपमध्ये पाहता येणार आहे.
पहा तिन्ही मालिकेचे संपुर्ण वेळापत्रक
- कसोटी मालिकेचे वेळापत्रक आणि वेळ
पहिली कसोटी: 12-16 जुलै - विंडसर पार्क, डॉमिनिका (भारतीय वेळेनुसार सांयकाळी 7.30 वाजता)
दुसरी कसोटी: 20-24 जुलै - क्वीन्स पार्क ओव्हल, त्रिनिदाद (भारतीय वेळेनुसार सांयकाळी 7.30 वाजता)
- एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक आणि वेळ
पहिला एकदिवसीय: 27 जुलै - केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस (भारतीय वेळेनुसार सांयकाळी 7.00 वाजता)
दुसरी एकदिवसीय: 29 जुलै - केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस (भारतीय वेळेनुसार सांयकाळी 7.00 वाजता)
तिसरी एकदिवसीय: 1 ऑगस्ट – ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद (भारतीय वेळेनुसार सांयकाळी 7.00 वाजता)
- टी-20 मालिकेचे वेळापत्रक आणि वेळ
पहिला T20I: 3 ऑगस्ट - ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद (भारतीय वेळेनुसार रात्री 8.00 वाजता)
दुसरा T20 आंतरराष्ट्रीय: 6 ऑगस्ट - नॅशनल स्टेडियम, गयाना (भारतीय वेळेनुसार रात्री 8.00 वाजता)
तिसरा T20 आंतरराष्ट्रीय: 8 ऑगस्ट - नॅशनल स्टेडियम, गयाना (भारतीय वेळेनुसार रात्री 8.00 वाजता)
चौथा T20 आंतरराष्ट्रीय: 12 ऑगस्ट - ब्रॉवर्ड काउंटी स्टेडियम, फ्लोरिडा (भारतीय वेळेनुसार रात्री 8.00 वाजता)
पाचवा T20 आंतरराष्ट्रीय: 13 ऑगस्ट - ब्रॉवर्ड काउंटी स्टेडियम, फ्लोरिडा (भारतीय वेळेनुसार रात्री 8.00 वाजता)