ब्रिस्बेन हीट (Photo Credits: Twitter/WBBL)

Brisbane Heat Women vs Melbourne Renegades Women 6th Match Womens Big Bash League 2024 Scorecard:   महिला बिग बॅश लीग 2024 चा सहावा सामना आज म्हणजेच 30 ऑक्टोबर रोजी ब्रिस्बेन हीट महिला विरुद्ध मेलबर्न रेनेगेड्स महिला यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना ब्रिस्बेनमधील (Brisbane) ॲलन बॉर्डर मैदानावर (Allan Border Field) खेळला गेला. या सामन्यात ब्रिस्बेन हीट संघाने मेलबर्न रेनेगेड्सचा 28  धावांनी पराभव केला आहे. या स्पर्धेत ब्रिस्बेन हीट महिला संघाची कमान जेस जोनासेनच्या  (Jess Jonassen) खांद्यावर आहे. तर, मेलबर्न रेनेगेड्स महिला संघाचे नेतृत्व सोफी मोलिनक्स (Sophie Molineux) करत आहे.  (हेही वाचा  -  शिखा पांडेला ब्रिस्बेन हीट कॅप देताना जेस जोनासेनचे भावनिक भाषण, व्हिडिओ व्हायरल )

तत्पूर्वी, स्पर्धेतील सहाव्या सामन्यात मेलबर्न रेनेगेड्स महिला संघाची कर्णधार सोफी मोलिनक्स हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या ब्रिस्बेन हीट संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही आणि अवघ्या सात धावांवर संघाला पहिला मोठा धक्का बसला. ब्रिस्बेन हीट संघाने 20 षटकात 8 गडी गमावून 169 धावा केल्या आहेत. ब्रिस्बेन हीटच्या जॉर्जिया रेडमायनने 39 चेंडूत 44 आणि लॉरेन विनफिल्ड-हिलने 19 चेंडूत 24 धावा केल्या. याशिवाय लॉरा हॅरिसने 31 आणि कर्णधार जेस जोनासेनने 25 धावांची नाबाद खेळी केली.

कॅप्टन सोफी मोलिनक्सने मेलबर्न रेनेगेड्स संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. मेलबर्न रेनेगेड्स महिलांसाठी सोफी मोलिनक्स आणि हेली मॅथ्यूजने प्रत्येकी 2 बळी घेतले. याशिवाय जॉर्जिया वेरेहॅम, डिआंड्रा डॉटिन आणि सारा कोयटे यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. मेलबर्न रेनेगेड्सला या मोसमातील पहिला विजय नोंदवण्यासाठी 170 धावांची गरज होती.

लक्ष्याचा पाठलाग करताना मेलबर्न रेनेगेड्स संघाची सुरुवात चांगली झाली आणि पहिल्या विकेटसाठी दोन्ही सलामीवीरांनी आक्रमक फलंदाजी करत 51 धावा केल्या. मेलबर्न रेनेगेड्स संघाला 20 षटकात 9 गडी गमावून केवळ 141 धावा करता आल्या. मेलबर्न रेनेगेड्सकडून नाओमी स्टॅलेनबर्गने सर्वाधिक 38 धावा केल्या. नाओमी स्टॅलेनबर्गशिवाय हेली मॅथ्यूजने 35 धावा केल्या.

ग्रेस पार्सन्सने ब्रिस्बेन हीट संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. ब्रिस्बेन हीटकडून ग्रेस पार्सन्सने सर्वाधिक तीन बळी घेतले. ग्रेस पार्सन्सशिवाय शिखा पांडेने दोन बळी घेतले. या दोघांशिवाय निकोला हॅनकॉक आणि कर्णधार जेस जोनासेन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.