World Cup 2024: टी-20 विश्वचषकापूर्वी  भारताला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू स्पर्धेतून बाहेर

आगामी टी-20 विश्वचषकापुर्वी (T20 World Cup) टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. या मोठ्या स्पर्धेपुर्वी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहमद शमी (Mohammed Shami)  स्पर्धेतून बाहेर झाला आहे. बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शहा (Jai Shah) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हा टीम इंडियाला बसलेला मोठा झटका मानला जात आहे. कारण विश्वचषक 2023 मध्ये मोहम्मद शमी ने केवळ 7 सामन्यात 24 विकेट घेतल्या होत्या. तसेच त्या स्पर्धेत तीन वेळा शमीने 5 पेक्षा जास्त विकेट घेतल्या होत्या.  (हेही वाचा - PM Modi Wishes Shami To Speedy Recovery: 'मला विश्वास आहे की तू या दुखापतीवर मात करशील', पंतप्रधान मोदींनी मोहम्मद शमीला दिल्या आरोग्यासाठी शुभेच्छा, पहा पोस्ट)

मोहम्मद शमीला विश्वचषक स्पर्धेनंतर दुखापतीचा त्रास जाणवत होता. शमीच्या घोट्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे शमी इंग्लंड येथे उपचारासाठी गेला होता. काही दिवसांपूर्वी, लंडन येथे शमीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यादरम्यान, शमीने आयपीएलमधून माघार घेतली होती. मात्र, आता तो आयपीएलच नाही तर संपूर्ण टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा देखील खेळणार नसल्याचं जय शहा यांनी माध्यमांना सांगितलं आहे.

वर्ल्डकप 2024 स्पर्धेनंतर बांगलादेशविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी शमीचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे, असं बीसीसीआय सचिव जय शहा यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता शमी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळणार नाही, हे आता स्पष्ट झालं आहे.  दरम्यान, जय शहा यांनी केएल राहुल आणि ऋषभ पंतच्या टी-20 विश्वचषक खेळण्याबाबत मोठी अपडेट दिली आहे.  ऋषभ पंत जर विकेटकीपिंग करू शकत असेल, तर तो विश्वचषक खेळू शकतो, असं जय शहा यांनी म्हटलं आहे.