Black Lives Matter: इंग्लंड-वेस्ट इंडिज खेळाडू आणि अंपायरांनी मैदानात गुडघ्यावर बसून हात उंच करत वर्णद्वेषाला दर्शवला विरोध, (See Video)
इंग्लंड-वेस्ट इंडिज इंग्लंड-खेळाडूंनी वर्णद्वेषाला दर्शवला विरोध (Photo Credit: Twitter/WestIndiesCricket)

इंग्लंड (England)-वेस्ट इंडिजमध्ये (West Indies) साऊदम्पटनच्या मैदानात कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. यासह तब्बल 116 दिवसांपासून ठप्प झालेलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट पून्हा एकदा रुळावर आले. इंग्लंड-वेस्ट इंडिज टीममध्ये दौऱ्यावर तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. यामधील पहिल्या सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे धुतला गेला. संपूर्ण दिवस पावसाने बॅटिंग केली त्यामुळे पहिल्या दिवशी फक्त 17.4 ओव्हरचाच खेळ खेळला गेला. पण त्यापूर्वी दोन्ही टीम आणि अंपायरांकडून एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. सध्या जगभरात वर्णभेदाविरुद्ध (Racism) आवाज उठवला जात असून यासाठी 'ब्लॅक लाईव्ह मॅटर्स' (Black Lives Matter) ही चळवळ सुरु आहे. या चळवळीला इंग्लंड-वेस्ट इंडिज क्रिकेट संघांनी पाठिंबा दिला आहे आणि मालिकेतील पहिला सामना सुरु होण्यापूर्वी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आणि अंपायरांनी याला विरोध दर्शवला. (ENG vs WI Test: माइकल होल्डिंग यांना लाईव्ह टीव्हीवर अश्रू अनावर, #BlackLivesMatter वर दिला शक्तिशाली संदेश Watch Video)

इंग्लंडचे खेळाडू फलंदाजीला आले आणि विंडीज खेळाडूंसह त्यांनी मैदानात एका गुडघ्यावर बसून एक हात उंच करत वर्णद्वेषाला विरोध दर्शवला. काही दिवसांपूर्वी अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड, या कृष्णवर्णीय इसमाचा पोलीस कोधडीत मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अमेरिकेत कृष्णवर्णीय बांधवांकडून रस्त्यावर विरोधप्रदर्शन होऊ लागले. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनीही या घटनेविरोधात आवाज उठवत खेळामध्येही वर्णद्वेष होत असल्याचं सांगितलं होतं. क्रिस गेल, डॅरेन सॅमी या विंडीज खेळाडूंनी आपल्याला वर्णद्वेषाचा सामना करावा लागल्याचं सांगितलं.

पाहा हा व्हिडिओ:

दुसरीकडे, पहिल्याच दिवशी पावसामुळे केवळ 17.4 ओव्हरचा खेळ झाला. पहिल्या दिवस अखेरीस इंग्लंडने एका विकेट गमावून 35 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून जो बर्न्स 20, तर जो डेन्ली 14 धावा करून खेळत होते. बर्न्ससह डोमिनिक सिब्लीने इंग्लंडकडून डावाची सुरुवात केली, पण दुसऱ्याच ओव्हरमध्ये शॅनन गॅब्रिएलनेसिब्लीला बाद करून टीमला पहिले यश मिळवून दिले. पावसामुळे सामन्याच्या पहिल्या दिवसाचे पहिले सत्र धुतले गेले. या दरम्यान खेळाडूंमध्ये एक नवी आशा निर्माण झाली जेव्हा टॉस झाला आणि संपूर्ण जगाने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे स्वागत केले.