Jyotiraditya Scindia Play Cricket: ज्योतिरादित्य सिंधिया यांची बॅटींग, बॉल लागून भाजप कार्यकर्ता जखमी (Video)
Jyotiraditya Scindia | (PC: Doordarshan National)

मध्य प्रदेश राज्यात बांधण्यात आलेल्या नव्या क्रिकेट स्टेडियममध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (yotiraditya Scindia) यांनी क्रिकेटचा सामना (Jyotiraditya Scindia Play Cricket) खेळला. सामन्यात फलंदाजी करताना ज्योतिरादित्य सिंधिया यांनी फटकावलेल्या चेंडूमुळे क्षेत्ररक्षण करत असलेला भाजपचा (BJP) एक कार्यकर्ता जखमी झाला. विकास मिश्रा असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. सिंधिया यांनी फटकावलेला चेंडू अडवण्याचा प्रयत्न विकास मिश्र याने केला. परंत, त्याचा प्रयत्न फसला आणि चेंडू थेट त्याच्या कपाळाव आदळला. ज्यामुळे त्याला मोठी जखम झाली. कार्यकर्ता जखमी होताच त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करुन उपचार करण्यात आले.

विकास मिश्र याच्या कपालावर मोठी जखम झाल्याने त्याला टाके घालण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. इटौरा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये ही घटना घडली. स्टेडियमचे उद्घाटन झाल्यानंतर एक मैत्रीपूर्ण सामना खेळवण्यात आला. यावेळी ज्योतिरादित्य सिंधिया फलंदाजी करत होते. दरम्यान, ही घटना घडली असल्याचे भाजपचे पदाधिकारी धीरज द्विवेदी यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले. (हेही वाचा, Air India ची दुर्दशा होण्यास यूपीए सरकार जबाबदार- ज्योतिरादित्य सिंधिया)

व्हिडिओ

विकास जखमी झाल्याने लगेचच खेळ थांबवण्यात आला. त्याला तातडीने संजय गांधी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. माजी मंत्री राजेंद्र शुक्ला आणि रेवाचे खासदार जनार्दन मिश्रा यांच्यासह ज्योतिरादित्य सिंधिया यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. तत्पूर्वी, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील विमानतळाची पायाभरणी केली. या वेळी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान देखील उपस्थित होते. विमानतळासाठी सुमारे 240 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुख्यमंत्री चौहान यांनी पायाभरणी समारंभात विंध्य द्रुतगती मार्गाच्या बांधकामाची घोषणा केली, जो राज्याची राजधानी भोपाळला सिंगरौलीशी जोडेल, सुमारे 660 किलोमीटर अंतरावर आहे, आणि त्याभोवती औद्योगिक क्लस्टर विकसित करेल.