Border Gavaskar Trophy 2024: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात पर्थमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) सुरू होत आहे. 22 नोव्हेंबरपासून दोन्ही संघ पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर आमनेसामने येतील. दोन्ही संघांकडून अद्याप प्लेईंग इलेव्हन जाहीर करण्यात आलेले नसले तरी भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्न मार्कल यांनी भारतीय संघातील 11 खेळाडूंबाबत मोठा इशारा दिला आहे. पर्थ कसोटीपूर्वी मॉर्नी मॉर्केलने 21 वर्षीय अष्टपैलू नितीश रेड्डीचे कौतुक केले. नितीश रेड्डी पर्थमध्ये कसोटी पदार्पण करण्याच्या शक्यतेबद्दल स्पष्ट इशारा देताना, मॉर्केल म्हणाला की ऑस्ट्रेलियातील पाच कसोटी सामन्यांमध्ये तो भारतासाठी एक टोक राखू शकतो.
नितीश कुमार रेड्डीची आयपीएलमध्ये चमकदारी कामगिरी
आंध्र प्रदेशचा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी आयपीएल 2024 मधील त्याच्या चमकदार कामगिरीमुळे प्रकाशझोतात आला. नितीशला फर्स्ट क्लासमध्ये केवळ 23 सामने खेळण्याचा अनुभव आहे, पण टीम इंडिया बऱ्याच दिवसांपासून अशाच सीम बॉलिंग ऑलराऊंडरच्या शोधात होती जो परदेश दौऱ्यावर वेगवान गोलंदाजांना मदत करू शकेल. (हे देखील वाचा: Virat Kohli vs Steve Smith Stats In Test Cricket: अशी आहे कसोटीत विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथची कामगिरी, पाहा या दोन्ही महान फलंदाजांची आकडेवारी)
नितीश रेड्डीकडे असेल लक्ष
नितीश रेड्डी यांचे कौतुक करताना मॉर्केल म्हणाले की, तो खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्यात अष्टपैलू बनण्याची क्षमता आहे. तो एक असा खेळाडू आहे जो आमच्यासाठी एक टोक हाताळू शकतो, विशेषतः सुरुवातीचे काही दिवस. तो विकेट-टू-विकेट गोलंदाजीही करतो. जगातील कोणत्याही संघाला वेगवान गोलंदाजांना मदत करणारा अष्टपैलू खेळाडू हवा असतो. त्यांचा कसा वापर करतो हे जसप्रीत बुमराहवर अवलंबून असेल. मालिकेत लक्ष ठेवण्यासाठी नक्कीच एक.
गिलच्या दुखापतीबाबत दिले मोठे अपडेट
मॉर्केलनेही शुभमन गिलच्या दुखापतीबाबत अपडेट दिला. शुभमन गिल लवकरच बरा होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 16 नोव्हेंबर रोजी पर्थमधील WACA येथे भारताच्या मॅच सिम्युलेशन दरम्यान स्लिप कॉर्डनमध्ये झेल घेताना गिलला डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. या दुखापतीमुळे तो पहिल्या कसोटीतून बाहेर जाण्याचा धोका आहे. भारत अ संघाकडून टॉप ऑर्डर बॅकअप म्हणून खेळल्यानंतर देवदत्त पडिक्कललाही परत बोलावले आहे. तो म्हणाला की शुभमन गिल दिवसेंदिवस बरा होत आहे. आम्ही कसोटीच्या दिवशी सकाळी निर्णय घेऊ. बिल्ड-अप दरम्यान त्याने मॅच सिम्युलेशनमध्ये चांगली कामगिरी केली, त्यामुळे आशा आहे की तो सुधारेल.