मुंबई: पाकिस्तान आणि बांगलादेश (PAK vs BAN) यांच्यातील कसोटी मालिका संपली आहे. यासह आयसीसीने नवीन क्रमवारी (ICC Test Ranking 2024) जाहीर केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठा बदल झाला आहे. बाबर आझम (Babar Azam) कसोटी क्रमवारीत अव्वल 10 मधून बाहेर पडला आहे. तर, कसोटी क्रमवारीत जो रूटचा (Joe Root) दबदबा कायम आहे. तो अजूनही पहिल्या स्थानावर आहे. त्याचे रेटिंग 922 पर्यंत वाढले आहे. जो रूटचे सर्वकालीन उच्च रँकिंग 923 होते. 2022 मध्ये त्याने हे मानांकन मिळवले. आता तो हा टप्पा गाठण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे.
Joe Root’s ascendancy at the top of ICC Men’s Test Batter Rankings continues 🔥#ICCRankings details ⬇️https://t.co/i6kYud5Qi5
— ICC (@ICC) September 4, 2024
स्टीव्ह स्मिथला झाला फायदा
न्यूझीलंडचा महान फलंदाज केन विल्यमसन दुसऱ्या स्थानावर कायम आहे. त्याचे रेटिंग 859 आहे. न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने क्रमवारीत वाढ केली आहे. तो चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. यापूर्वी तो पाचव्या स्थानावर होता. स्मिथ बराच काळ एकही सामना खेळलेला नाही, पण हॅरी ब्रूकच्या खराब फॉर्मचा फायदा त्याला झाला आहे. हॅरी ब्रूकला एक स्थान गमवावे लागले आहे. तो पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. (हे देखील वाचा: IND vs BAN Test Series 2024: भारत-बांग्लादेश कसोटी मालिकेसाठी लवकरच संघ होणार जाहीर, जाणून घ्या कोणाल मिळू शकते संधी)
बाबरचे झाले नुकसान
ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा 9व्या स्थानावर पोहोचला आहे. तर मोहम्मद रिजवानही टॉप 10 मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. तो ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅबुशेनसह संयुक्तपणे 10व्या क्रमांकावर आहे. बाबरबद्दल बोलायचे झाले, तर त्याचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तो 12व्या स्थानावर घसरला आहे. बाबर आझम एकेकाळी टॉप 3 मध्ये होता, पण खराब फॉर्ममुळे तो आता टॉप 10 मधून बाहेर पडला आहे.
जाणून घ्या भारतीय खेळाडूंची अवस्था
भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर कर्णधार रोहित शर्मा 751 रेटिंगसह सहाव्या स्थानावर कायम आहे. तर यशस्वी जैस्वाल सातव्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर तो आठव्या क्रमांकावर आहे. या तिन्ही खेळाडूंनी अद्याप एकही कसोटी सामना खेळलेला नाही.