Ben Stokes ने नाकारले 'न्यूझीलंडर ऑफ द ईयर' चे नामांकन, Kane Williamson याला देण्याची व्यक्त केली इच्छा
बेन स्टोक्स आणि केन विल्यमसन (Photo Credit: ICC/Twitter)

इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) ने आपल्या शेवटच्या ओव्हरमधील खेळीने सर्व किवी चाहत्यांची मनं दुखावली. पण तरीही ज्या खेळाडूने न्यूझीलंडचा (New Zealand) विजय हिसकावला, त्याच स्टोक्सला 'न्यूझीलंडर ऑफ द ईयर' (New Zealander of the Year award) या पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे. शिवाय आश्चर्यकारक म्हणजे याच पुरस्कारासाठी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याला देखील नामांकन मिळाले आहे. स्टोक्सचे आई-वडील न्यूझीलंडचे आहे आणि स्टोक्सचा जन्मही न्यूझीलंडमध्ये झाला असल्या कारणाने त्याला या पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे. वयाच्या 12 व्या वर्षी बेन त्याच्या वडीलांसोबत इंग्लंडमध्ये स्थायी झाला होता. पुढे एक क्रिकेटर म्हणून तो घडला आणि इंग्लंडसाठीच खेळला. पण आता बेनने न्यूझीलंडने दिलेले हे नामांकन अस्वीकार केले आहे. (Ashes 2019: इंग्लंड-ऑस्ट्रेलिया अॅशेस दरम्यान टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदा जर्सीवर असणार खेळाडूंचे नाव आणि नंबर, पहा हे Photos)

स्टोक्सने आपल्या व्यवस्थापकीय संस्थेद्वारे एक निवेदन केले आहे. यात स्टोक्स म्हणाला की, "यंदाच्या 'न्यूझीलंडर ऑफ द ईयर' अवॉर्डसाठी मला नामांकित केल्याबद्दल मला आनंद होत आहे. मला न्यूझीलंड आणि माओरी वारसाबद्दल अभिमान आहे पण या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी मी योग्य नाही. तिथे खूप लोकं आहे जे या सन्मानाचे पात्र आहे आणि त्यांनी न्यूझीलंडसाठी बरेच काही केले आहे."

"मी इंग्लंडला विश्वचषक जिंकण्यास सहाय्य केले आणि आणि माझे जीवन युकेमध्ये स्थाईरित्या स्थापित झाले आहे- मी 12 वर्षांचा होतो तेव्हापासूनच."

स्टोक्सशिवाय, विल्यमसनलाही या पुरस्कारासाठी नामांकन मिळण्याची अपेक्षा आहे. "मला वाटते की संपूर्ण देशाने न्यूझीलंडच्या कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) ला आपला पाठिंबा दिला पाहिजे. त्याला एक लेजेंड म्हणून सन्मानित केले पाहिजे."

"त्याने विश्वचषक स्पर्धेत आपली सन्मानाने आणि अतिशय उत्कृष्टपणे संघाचे नेतृत्व केले. तो विश्वचषकाचा सर्वोत्तम खेळाडू होता आणि अनेक कर्णधारांसाठी प्रेरणादायी होता. तो प्रत्येक परिस्थितीत नम्रता आणि सहानुभूती दाखवली. एक न्यूझीलंडर बनण्यासाठी कसे असावे हे त्याने दाखवले."

"तो या सन्मानासाठी योग्य कंडेंडर आहे. न्यूझीलंड, त्याला पूर्ण आधार द्या. तो त्यास पात्र आहे आणि मी माझे मत त्याला देतो."