Photo Credit - ESPNCRICINFO

Australia National Cricket Team vs England National Cricket Team: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा चौथा सामना ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथ करत आहे. तर, इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. दरम्यान, इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 351 धावा केल्या. अपेक्षेप्रमाणे, लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमने फलंदाजांना साथ दिली. परिस्थितीचा फायदा घेत बेन डकेटने 165 धावांची ऐतिहासिक खेळी खेळली. डकेट चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. त्याच्याशिवाय जो रूटनेही 68 धावांचे महत्त्वाचे योगदान दिले.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला हा निर्णय खूप चांगला ठरला कारण बेन द्वारशुइसने इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना 6 षटकांच्या आत बाद केले. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना विकेटसाठी आसुसलेले दिसले. बेन डकेट आणि जो रूट यांच्यात 158 धावांची मोठी भागीदारी झाली. कर्णधार जोस बटलरनेही 23 धावा केल्या. आणि  इंग्लंड संघाने निर्धारित 50 षटकांत आठ गडी गमावून 351 धावा केल्या.

दुसरीकडे, बेन द्वारशुइसने ऑस्ट्रेलियाला पहिले मोठे यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाकडून बेन द्वारशुइसने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. बेन द्वारशुइस व्यतिरिक्त, अॅडम झांपा आणि मार्नस लाबुशेन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला 50 षटकांत 352 धावा कराव्या लागतील. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेची सुरुवात विजयाने करायची आहे.