KL Rahul (Photo Credit - Twitter)

शनिवारी श्रीलंका आणि अफगाणिस्तान (SL vs AFG) यांच्यातील सामन्याने आशिया चषकाची (Asia Cup 2022) सुरुवात होत आहे. दुसऱ्या दिवशी रविवारी भारत आणि पाकिस्तानचे (IND vs PAK) संघ आमनेसामने येतील. सामन्यापूर्वी टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) म्हणाला की, त्यांचा संघ या सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहे. त्याला या स्पर्धेत भारताच्या भवितव्याबद्दल प्रचंड विश्वास आहे. पाकिस्तानचा पुन्हा सामना करण्यासाठी संघ उत्सुक आहे. राहुलने पत्रकार परिषदेत विराट कोहलीच्या (Virat Kohli) फॉर्मबाबतही मत व्यक्त केले. विराटच्या फॉर्मची संघाला काळजी नाही, असे तो म्हणाला. राहुल म्हणाला, “विराट कोहलीने फॉर्ममध्ये यावे अशी आमची सर्वांची इच्छा आहे, पण आम्हाला त्याची चिंता नाही. भारतासाठी सामने जिंकण्याची त्याची मानसिकता नेहमीच सारखीच असते आणि गेली अनेक वर्षे त्याने तसे केले आहे.

'पाकिस्तानसमोर मोठे आव्हान'

“आम्ही भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी नेहमीच तयार असतो कारण आम्ही एकमेकांसोबत कोठेही खेळत नाही. आम्ही फक्त या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळतो. हा नेहमीच रोमांचक काळ असतो आणि पाकिस्तानसारख्या संघाविरुद्ध स्पर्धा करणे हे आपल्या सर्वांसाठी मोठे आव्हान असते. (हे देखील वाचा: Asia Cup 2022 Squads: आशिया चषकमध्ये जेतेपदासाठी 6 संघ भिडणार, येथे जाणून घ्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांचे पथक)

दहा महिन्यांनंतर दोन्ही संघांमध्ये सामना

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा नेहमीच क्रिकेट चाहत्यांची पहिली पसंती राहिला आहे. मग तो आशिया चषक असो वा विश्वचषक किंवा इतर कोणतेही फॉरमॅट. दहा महिन्यांनंतर 28 ऑगस्ट रोजी दुबईत आशिया कपमध्ये दोन्ही देश आमनेसामने येणार आहेत. यापूर्वी, दोघेही 24 ऑक्टोबर 2021 रोजी टी-20 विश्वचषक स्पर्धेत एकाच मैदानावर खेळले होते, ज्यामध्ये पाकिस्तानने 10 विकेट्सने विजय मिळवला होता. आशिया चषकातील भारत-पाक संघर्षाबद्दल बोलायचे झाले तर येथे टीम इंडियाचा वरचढ आहे. त्यांनी 14 पैकी आठ सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने पाच जिंकले आहेत.