Sachin Tendulkar International Debut: सचीन तेंडुलकर यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणाबद्दल बीसीसीआयने सांगीतली आठवण
Sachin Tendulkar | (Photo Credits: Face Book)

क्रिकेट विश्वातील महान फलंदाज अशी ओळख असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर  (Sachin Tendulkar) आणि त्यांच्या चाहत्यांसाठी आजचा दिवश विशेष आहे. सन 1989 मध्ये आजच्याच दिवशी (15 नोव्हेंबर) सचिन तेंडुलकर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण (Sachin Tendulkar Debut In International cricket ) केले होते. त्यानंतर पुढे 24 वर्षांनी म्हणजेच 2013 मध्ये त्यांनी मुंबई येथील वानखेडे स्टेडीयमवर (Wankhede Stadium) शेवटचा कसोटी सामना खेळला.

सचिन तेंडुलकर यांनी तब्बल 664 सामन्यांमध्ये तब्बल 34,357 धावा करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून आपली कारकीर्द गाजवली. असे असले तरी त्यांची सुरवात मात्र कराची येथील एका सामन्यादरम्यान 24 चेंडू 15 धावा अशी झाली होती. (हेही वाचा, Video: मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने घेतला रस्त्यावरच्या टपरीवरचा चहाचा आस्वाद, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ)

सचिन तेंडुलकर कामगिरी

कसोटी सामने- 200 (शतक- 51, अर्धशतके- 68, धावा- 15,29)

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने- 463 (धशतके 49, अर्धशतके- 96, धवा- 18,426)

बीसीसीआय ट्विट

सचिन तेंडुलकर यांनी भारतीय क्रिकेट संघातून 16 वर्षे आणि 205 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. भारतीय क्रिकेट संघाच्या वतीने पाकिस्तानी क्रिकेट संघाचा सामना करण्यासाठी सचिन तेंडूलकर मैदानावर उतरला. तेव्हापासून तो प्रदीर्घ काळ मैदान गाजवतच राहिला. त्याचा सुरुवातीचाच सामना वसीम अक्रम, इम्रान खान आणि नवोदित वकार युनूस यांचा समावेश असलेल्या घातक पाकिस्तानी गोलंदाजांसोबत होता.