IND vs BAN Test Series: भारताला पुढील महिन्यात बांगलादेशचे 2 कसोटी सामने आणि 3 टी-20 सामने खेळायचे आहेत. भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील ही मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने (BCCI) देशांतर्गत आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल केला आहे. बीसीसीआयने केलेल्या या बदलाचा बांगलादेशविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेवर आणि पुढील वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेवर परिणाम होईल. बीसीसीआयने बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेतील एका सामन्याचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेत बदल
भारताला 6 ऑक्टोबरपासून बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे होणार होता. मात्र, बीसीसीआयने यात बदल करत पहिल्या सामन्याचे ठिकाण बदलले आहे. आता भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला टी-20 सामना धर्मशाला ऐवजी ग्वाल्हेरमध्ये खेळवला जाणार आहे.
🚨 NEWS 🚨
BCCI issues revised schedule for international home season (2024-25).
All the details 🔽 #TeamIndia https://t.co/q67n4o7pfF
— BCCI (@BCCI) August 13, 2024
बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रक जारी करताना याचे कारण स्पष्ट केले. बोर्डाने सांगितले की, 'धर्मशाला क्रिकेट मैदानाच्या नूतनीकरणाचे काम हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनकडून केले जात आहे. त्यामुळे पहिला सामना आता धर्मशालाऐवजी ग्वाल्हेरमध्ये खेळवला जाणार आहे. (हे देखील वाचा: ICC Men's ODI Batting Rankings: रोहित शर्माने एकदिवसीय क्रमवारीत घेतली मोठी झेप, बाबर आझमची राजवट धोक्यात)
बदलानंतर भारत आणि बांगलादेश पूर्ण वेळापत्रक
भारत विरुद्ध बांगलादेश पहिली कसोटी – 19 ते 23 सप्टेंबर, चेन्नई
भारत विरुद्ध बांगलादेश दुसरी कसोटी – 27 ते 01 ऑक्टोबर, कानपूर
भारत विरुद्ध बांगलादेश पहिला टी-20 – 6 ऑक्टोबर, ग्वाल्हेर
भारत विरुद्ध बांगलादेश दुसरा टी-20 – 9 ऑक्टोबर, दिल्ली
भारत विरुद्ध बांगलादेश तिसरा टी-20 – 12 ऑक्टोबर, हैदराबाद
भारत आणि इंग्लंड मालिकेच्या वेळापत्रकातही बदल
बांगलादेशशिवाय भारतीय संघ पुढील वर्षी जानेवारीत इंग्लंडचेही यजमानपद भूषवणार आहे. इंग्लंड संघ भारताविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने या मालिकेच्या वेळापत्रकातही बदल केला आहे. वास्तविक, या मालिकेतील पहिला सामना 22 जानेवारी रोजी चेन्नईत होणार होता. तर दुसरा सामना 25 जानेवारीला कोलकाता येथे होणार होता.
आता बीसीसीआयने स्थळ बदलले आहे. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना 22 जानेवारीला चेन्नईऐवजी कोलकात्यात खेळवला जाईल. तर दुसरा टी-20 सामना कोलकात्याऐवजी चेन्नईत खेळवला जाईल. कोलकाता पोलिसांनी बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या विनंतीनंतर बीसीसीआयने हा बदल केला आहे. वास्तविक, कोलकाता पोलिसांनी प्रजासत्ताक दिनाच्या सुरक्षेसंदर्भात वेळापत्रकात बदल करण्याची विनंती केली होती. मालिकेतील इतर तीन सामन्यांच्या स्थळांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.