BCCI Central Contracts: बीसीसीआय करारात तीन खेळाडूंचे डिमोशन पक्के, केएल राहुल आणि रिषभ पंत यांना प्रमोशन नाहीच - Report
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Puajra), अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि इशांत शर्मा  (Ishant Sharma) यांसारख्या वरिष्ठ भारतीय क्रिकेटपटूंना बीसीसीआयकडून वार्षिक करारांमध्ये  (BCCI Central Contract) डिमोशन मिळण्याची शक्यता आहे. या दोन्ही वरिष्ठ फलंदाजांना 2021 मध्ये बीसीसीआयने (BCCI) ‘ग्रेड A’ करार करार दिला होता आणि त्यांचे प्रत्येकी 5 कोटी रुपये वेतन आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार रहाणे आणि पुजारा, जे बॅटने संघर्ष करत आहेत आणि जनकऱ्यांच्या टीकेखाली आहेत, त्यांना ‘ग्रेड A’मधून ‘ग्रेड B’ मध्ये ढकलले जाईल. रहाणे आणि पुजारा गेल्या काही काळापासून फारशा धावा करत नाहीत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये त्यांच्या स्थानावरही शंका होती. पण संघ व्यवस्थापनाने तीनही सामन्यांमध्ये दोन्ही खेळाडूंना पाठीशी घातले पण ते विश्वासाची परतफेड करण्यात अपयशी ठरले. रहाणेने 3 कसोटीत 22.66 च्या सरासरीने 136 तर पुजाराने 124 धावा केल्या. (BCCI Central Contract: केएल राहुल आणि Rishabh Pant यांची नजर ‘A+’ करारावर, कोणाचा होणार पत्ता कट, कोणाची लागणार वर्णी; वाचा सविस्तर)

दरम्यान, केएल राहुल (KL Rahul) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांना केंद्रीय करार यादीत बढती मिळणार नाही, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. दोन्ही खेळाडू सर्व प्रकारात भारतीय संघात नियमित असल्यामुळे त्यांना A+ श्रेणीत बढती मिळण्याची शक्यता होती. पण यंदा तसे होणार नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. राहुलने कसोटी संघातही आपले स्थान निश्चित केले आहे आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील दुसऱ्या कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व केले आहे. त्‍याने 3 वनडेमधेही संघाचे नेतृत्व केले. त्याला लवकरच कसोटी संघाचा कर्णधार किंवा उपकर्णधारपद दिले जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, पंतबद्दल बोलायचे तर त्याने सर्व फॉरमॅटमध्ये आपले पराक्रम दाखवले आहेत आणि तो टीम इंडियाचा कायमचा सदस्य आहे. राहुल आणि रिषभ, या दोघांना सध्या बीसीसीआयच्या ‘ग्रेड A’  करारातून प्रत्येकी 5 कोटी रुपये मिळतात.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी बाकावर बसलेल्या इशांत शर्मालाही आगामी केंद्रीय करारामध्ये पदावनती मिळण्याचे सांगण्यात येत आहे. “टी-20 विश्वचषकानंतर हा मसुदा तयार करण्यात आला होता. लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल. भारतीय क्रिकेटला पुढे जायचे आहे आणि नवीन खेळाडूंच्या कामगिरीकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही,” बीसीसीआयच्या सूत्राने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले. याशिवाय विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे ग्रेड A+ श्रेणीतील तीन खेळाडू आहेत. यांना बोर्डाकडून वार्षिक 7 कोटी मिळतात.