हारिस रऊफ (Photo Credit: Twitter/BBL)

मेलबर्न स्टार्सचा (Melbourne Stars) वेगवान गोलंदाज हॅरिस रऊफ (Haris Rauf) याने बिग बॅश लीग (Big Bash League) मध्ये अद्यापही चांगली कामगिरी बजावली आहे. सिडनी थंडर (Sydney Thunder) संघाविरुद्ध सामन्यात रऊफने शानदार हॅटट्रिक घेतली. सिडनी थंडरच्या अखेरच्या ओव्हरमध्ये रऊफने दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्या चेंडूत तीन गडी बाद करत हॅटट्रिक घेतली. सामन्यात रऊफने 4 ओव्हरमध्ये 23 धावा देऊन 3 गडी बाद केले. विशेष म्हणजे बिग बॅश लीगमधील ही सलग दुसरी हॅटट्रिक आहे. रऊफच्या अगदी आधीच्या सामन्यात अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान (Rashid Khan) यानेही हॅटट्रिक पूर्ण केली होती. बीबीएलच्या (BBL) 27 व्या सामन्यात राशिदने हॅटट्रिक घेतली, तर याच लीगच्या 28 व्या सामन्यात काही तासांनंतर पाकिस्तानी गोलंदाज हॅरिस रॉफने कांगारूच्या भूमीवर हॅटट्रिक घेण्याची कामगिरी बजावली. (BBL 2019-20: राशिद खान याने बिग बॅश लीगमध्ये हॅटट्रिक घेत केला कहर, नोंदवले अनेक रेकॉर्डस्, पाहा Video)

मेलबर्न स्टार्सकडून खेळत हॅरिसने प्रथम 20 व्या षटकातील दुसर्‍या चेंडूवर मॅथ्यू गिलक्सला बाद केले. यानंतर हॅरिसने कॅलम फर्ग्युसनला माघारी धाडले. चौथ्या बॉलनंतर हॅरिसने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू डॅनियल सॅम्स याला एलबीडब्ल्यू बाद करून आपली हॅटट्रिक पूर्ण केली. या सामन्यात पाकिस्तानचा रहिवासी असलेल्या हॅरिसने एकूण 4 ओव्हर फेकले आणि त्यामध्ये त्याने केवळ 23 धावांवर 3 मोठे विकेट घेतले. यापूर्वी या पाकिस्तानी गोलंदाजाने त्याच्या वेगाने फलंदाजांना चांगला त्रास दिला. हॅरिसने मागील 4 सामन्यात 13 गडी बाद केले आहे. पाहा हॅरिसच्या हॅटट्रिकचा हा व्हिडिओ:

या मोसमात 5 विकेट घेणारा हॅरिस हा एकमेव गोलंदाज आहे. त्याचा इकॉनॉमी रेटदेखील फक्त 5.87 आहे. हॅरिस हा मेलबर्न स्टार्सचा अव्वल क्रमांकाचा गोलंदाज आणि विकेटच्या बाबतीत लीगचा दुसरा गोलंदाज आहे. डेल स्टेन याला दुखापत झाल्यानंतर हॅरिसला संघात स्थान देण्यात आले, मात्र जेव्हा स्टेनने पुनरागमन केले तेव्हा त्याला संघातून वगळण्यात आले. तथापि, जेव्हा जेव्हा त्याला संधी दिली जाते तेव्हा त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे.