कोरोना व्हायरसवर मात करून क्रिकेट खरोखरच परत येत आहे. इंग्लंड-वेस्ट इंडीज कसोटी मालिकेसह आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू झाले आहे, तर कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) टी-20 लीगने नुकतच 2020 हंगामासाठी आपले फिक्स्चर जाहीर केले होते. आणि आता बिग बॅश लीग (Big Bash League) सीझन 10 चे वेळापत्रक घोषित झाले आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगनंतर पुन्हा सुरू होणारी बीबीएलची (BBL) दुसरी टी-20 लीग बनली आहे. बीबीएल सीझन 10 चे वेळापत्रकही जाहीर झाले असून नवीन हंगाम 03 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. वेगवेगळ्या देशांतून क्रिकेट सामने खेळण्यासाठी प्रवास करणाऱ्या खेळाडूंच्या संपूर्ण क्वारेन्टीन प्रक्रियेबद्दल आणि त्यांच्या सुरक्षिततेबद्दल शंका निर्माण झाली आहे पण कोविड-19 लक्षात घेत क्रिकेट अस्टलियाने बीबीएलच्या 10 व्या हंगामासाठी लवचिक आणि दीर्घ वेळापत्रक जाहीर केले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये टी -20 लीगची 10 वी आवृत्ती सीझन 9 च्या 2 आठवड्यांपूर्वी सुरू होईल. बीबीएल 10 ची सुरुवात भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेच्या (India-Australia Test Series) पहिल्या सामन्याच्या दिवशी होईल. (IPL 2020 Update: ICCच्या पुढील बैठकीत होऊ शकतो टी-20 वर्ल्ड कपबाबत मोठा निर्णय, आयपीएल आयोजनाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता)
हंगामाचा पहिला सामना मेलबर्न स्ट्रायकर्स (Melbourne Strikers) आणि मेलबर्न रेनेगेड्सविरुद्ध (Melbourne Renegades) अॅडिलेड ओव्हल मैदानात 3 डिसेंबर रोजी खेळला जाईल. या स्पर्धेची अंतिम लढत 6 फेब्रुवारी रोजी होईल. ब्रिस्बेनच्या गाब्बा येथे भारताच्या बहुप्रतीक्षित ऑस्ट्रेलिया दौर्याच्या सुरुवातीच्या दिवशी बीबीएल 10 चा पहिला सामना खेळला जाईल. बॉर्डर गावस्कर (Border-Gavaskar) मालिकेच्या सुरूवातीस बीबीएल 10 ची ही सुरूवात होणार असल्याने स्टीव्ह स्मिथ, पॅट कमिन्स आणि डेविड वॉर्नरसह ऑस्ट्रेलियाचे स्टार कसोटी खेळाडू स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात खेळण्याची शक्यता नाही. त्यानंतर, सिडनी क्रिकेट मैदानावर गुलाबी कसोटी 7 जानेवारी 2021 रोजी संपणार असल्याने अव्वल कसोटीपटू दुसर्या आठवड्यापासून बीबीएलमध्ये सामील होतील.
There's more important things in the world than cricket right now, but here's how we'd love to see the summer of BBL unfold. Stay safe and healthy everyone! #BBL10 pic.twitter.com/yE3tKuAEGp
— KFC Big Bash League (@BBL) July 15, 2020
WBBLवेळापत्रक
Here's the #WBBL06 fixture as it currently stands. pic.twitter.com/HvwfDZ3zds
— Rebel Women's Big Bash League (@WBBL) July 15, 2020
दरम्यान, महिला बिग बॅश लीग (डब्ल्यूबीबीएल) च्या 6 व्या हंगामात एक स्वतंत्र आवृत्ती कायम राहील. डब्ल्यूबीबीएल हंगाम ऑक्टोबर 17-18 च्या शनिवार व रविवार रोजी सुरू होणार आहे. यंदा हंगामातील तीन सामन्यांची फायनल मालिका 27 ते 29 नोव्हेंबर दरम्यान खेळली जाणार आहे आणि वेळ व स्थान निश्चित केले जाईल.