IND U19 vs BAN U19 (Photo Credit - X)

U19 Asia Cup 2024 Final Live Streaming: 29 नोव्हेंबरपासून अंडर-19 आशिया कप 2024 (U19 Asia Cup 2024) स्पर्धेला सुरुवात झाली. आता या स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रविवारी 8 डिसेंबर 2024 रोजी आशिया कप 2024 च्या अंतिम फेरीत भारत आणि बांगलादेशचे अंडर-19 संघ आमनेसामने येतील. दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत चमकदार कामगिरी करत जेतेपदाच्या लढतीत आपले स्थान पक्के केले. भारतीय संघाने उपांत्य फेरीत श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव करत आपली दमदार दावेदारी सादर केली. 13 वर्षीय युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी याने बॅट आणि बॉलने चमकदार कामगिरी करत संघाला विजयापर्यंत नेले. 174 धावांचे लक्ष्य केवळ 21.4 षटकांत पूर्ण करण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. या विजयासह भारताने विक्रमी नवव्यांदा अंडर-19 आशिया कपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

पाकिस्तानचा पराभव करुन बांगलादेश फायनलमध्ये

दुसरीकडे, बांगलादेशने उपांत्य फेरीत पाकिस्तानचा 7 विकेट्स राखून पराभव केला. संघाचा कर्णधार मोहम्मद अझीझुल हकीम तमीमने शानदार खेळी करत संघाला अंतिम फेरीत नेले. यावेळी बांगलादेशचा संघ इतिहास रचण्याच्या इराद्याने अंतिम सामन्यात प्रवेश करेल. (हे देखील वाचा: SA vs SL 2nd Test 2024 Day 3 Scorecard: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 3 विकेट गमावल्या आणि 191 धावा जोडल्या, श्रीलंकेवर 221 धावांची घेतली आघाडी)

स्पर्धा कधी आणि कुठे होणार?

अंडर-19 आशिया कप 2024 चा अंतिम सामना 8 डिसेंबर 2024 रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता सुरू होईल. भारतीय चाहत्यांना या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. याशिवाय SonyLIV ॲप आणि वेबसाइटवरही लाईव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेता येईल.

दोन्ही संघांची खेळाडू

भारतीय संघ

मोहम्मद अमन (कर्णधार), आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, सी आंद्रे सिद्धार्थ, किरण चोरमले (उपकर्णधार), प्रणव पंत, हरवंशसिंग पनगालिया (यष्टीरक्षक), अनुराग कवडे (यष्टीरक्षक), हार्दिक राज, मोहम्मद इनान, केपी कार्तिकेय, समर्थ नागराज, युधाजित गुहा, चेतन शर्मा, निखिल कुमार.

बांगलादेश संघ

जवाद अबरार, कलाम सिद्दीकी अलिन, मोहम्मद अझीझुल हकीम तमीम (कर्णधार), मोहम्मद शिहाब जेम्स, मोहम्मद रिझान हसन, मोहम्मद फरीद हसन फैसल (विकेटकीपर), देबाशीष सरकार देबा, मोहम्मद समीन बसीर रातुल, मारूफ मृधा, अल फहाद, इक्बाल हुसैन इमन, अश्रफुझमान बोरेनो, मोहम्मद रिफत बेग, साद इस्लाम रझीन, मोहम्मद रफी उज्जमन रफी.