India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team Match Scorecard: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (India National Cricket Team) विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील दुसरा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवला आहे. यासह भारताने मालिकेवरही कब्जा केला आहे. दुसऱ्या डावात बांगलादेशचा संघ 146 धावांवर गारद झाला. आणि भारताला विजयासाठी 95 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 7 विकेट राखुन सामन्यावर विजय मिळवला.
2ND Test. India Won by 7 Wicket(s) https://t.co/VYXVdyNHMN #INDvBAN @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) October 1, 2024
दुसऱ्या डावात बांगलादेश 146 धावांवर गारद
आज पाचव्या दिवशी बांगलादेशचा दुसरा डाव 146 धावांत आटोपला. बांगलादेशकडून शादमान इस्लामने 50 सर्वाधिक धावा केल्या. भारताकडून रविचंद्रन अश्विन, रवींद्र जेडजा आणि जसप्रीत बुमराह यांनी बांगलादेशला दुसऱ्या डावात लवकर आऊट करण्यात महत्त्वाचे योगदान दिले. आणि भारताला विजयासाठी 95 धावांचे लक्ष्य मिळाले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यालाठी आलेल्या भारतीय संघाने 17.2. षटकात सात विकेट राखुन लक्ष्य गाठले. भारताकडून यशस्वी जैस्वालने अर्धशतक झळकावले.
हे देखील वाचा: Ravichandran Ashwin: रविचंद्रन अश्विनची ऐतिहासिक कामगिरी; जगातील कोणत्याच खेळाडूला जमला नाही हा पराक्रम
मोमिनुल हकने केल्या नाबाद 107 धावा
त्याआधी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत बांगालदेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पहिल्या दिवशी अर्धा दिवसाचा खेळ खेळला गेला. त्यानंतर पावसाने हजेरी लावली आणि ओल्या मैदानामुळे तीन दिवसाचा खेळ वाया गेला. त्यानंतर चौथ्या दिवशी खेळला सुरुवात झाली. बांगलादेशने पहिल्या डावात दहा विकेट गमावून 233 धावा केल्या. बांगलादेशकडून मोमिनुल हकने नाबाद 107 सर्वाधिक धावा केल्या. तर भारताकडून जसप्रीत बुमराहने तीन आणि सिराज-अश्विनने प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या.
रोहित-जैस्वालची आक्रमक फलंदांजी
प्रत्युत्तरात भारताने चौथ्या दिवशी आक्रमक फलंदाजी करत 285 धावांवर 9 विकेट गमावून पहिला डाव घोषित केला. भारताकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी स्फोटक फलंदाजी केली. यशस्वीने 51 चेंडूत 72 तर रोहित शर्माने 3 षटकाराच्या जोरावर 11 चेंडूत 23 धावा केल्या. तसेच केएल राहुल (68) आणि विराट कोहलीने (47) धावा केल्या. तर दुसरीकडे मेंहदी हसन मिराज आणि शकिब अल हसन यांनी 4-4 विकेट घेतल्या.