ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात बांगलादेशच्या फलंदाजाने (BAN vs AFG) इतिहास रचला आहे. या खेळाडूने असा पराक्रम केला आहे जो कसोटी क्रिकेटमध्ये करणे सोपे नाही. बांगलादेशसाठी अशी कामगिरी करणारा तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा खेळाडू ठरला आहे. आम्ही बोलत आहोत बांगलादेशचा फलंदाज नजमुल हसन शांतो (Najmul Hasan Shanto) याच्याबद्दल, ज्याने अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावून दुहेरी धडाका लावला. (हे देखील वाचा: IND vs PAK Asia Cup 2023: आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान तीन वेळा येवु शकतात आमने-सामने, जाणून घ्या समीकरण)
शांतोने पहिल्या डावात 146 धावा केल्या, त्यामुळे बांगलादेशने 382 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ 146 धावांवर गारद झाला. यानंतर बांगलादेशने अफगाणिस्तान संघाला फॉलोऑन न देता दुसऱ्या डावाला सुरुवात केली. यानंतर शांतोने दुसऱ्या डावातही अवघ्या 115 चेंडूत शतक झळकावले. दोन्ही कसोटी डावांत शतक झळकावणारा तो बांगलादेशचा दुसरा खेळाडू ठरला. विशेष बाब म्हणजे त्याच्यासोबत क्रिझवर असलेला पहिला खेळाडू मोमिनुल हक होता ज्याने 2018 मध्ये चितगावमध्ये श्रीलंकेविरुद्ध अशी कामगिरी केली होती. मोमिनुलने 176 आणि 105 धावांची खेळी खेळली पण तो सामना अनिर्णित राहिला.
A century in the first innings ✅
A century in the second innings ✅
Follow #BANvAFG live: https://t.co/xTMq0d9WtM pic.twitter.com/813VMwZZax
— ICC (@ICC) June 16, 2023
शांतोचा करिअर रेकॉर्ड कसा आहे?
नजमुल हसनच्या कसोटी कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, त्याने 2017 मध्ये बांगलादेशकडून कसोटी पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 23 सामन्यांत 1200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत आणि 30 च्या वरच्या सरासरीने. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे चौथे शतक ठरले. 163 धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे, ती या डावात तो मोडू शकतो का हे पाहावे लागेल. तो सध्या बांगलादेशचा अनुभवी खेळाडू आहे. त्याने 2018 मध्ये एकदिवसीय आणि 2019 मध्ये टी-20 पदार्पण केले. एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्याचे शतक आहे.