Babar Azam Accused For Sexual Abuse: बाबर आझमचा लव्ह, सेक्स आणि धोखा; पाकिस्तानी कर्णधारावर महिलेचे लैंगिक अत्याचार, आर्थिक फसवणुकीचे गंभीर आरोप
बाबर आजम (Photo Credit: Getty)

पाकिस्तानचा (Pakistan) कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) 10 वर्षांपर्यंत शोषण केले आणि लग्नाची खोटी आश्वासने दिल्याचा गंभीर आरोप एका महिलेने केला आहे. शनिवारी एका स्फोटक पत्रकार परिषदेत महिलेने बाबरवर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केल्याचा आरोप केला. या महिलेने सांगितले की तिने बाबरला त्याच्या कठीण काळात पाठिंबा दिला आणि आर्थिक मदतही केली. तिने पुढे खुलासा केला की ते शाळेतील मित्र आहेत. या महिलेनुसार बाबरने 2010 मध्ये तिला लग्नासाठी मागणी घातली आणि पुढच्या वर्षी दोघांनी कोर्टात लग्न करण्यासाठी पळ काढला. परंतु 2012 अंडर-19 विश्वचषकात पाकिस्तानचे नेतृत्व करणाऱ्या बाबरने प्रसिद्धी मिळविल्यामुळे त्याची राष्ट्रीय संघात निवड झाली आणित्यांचे मत बदलले. पुढे बाबरने पोलिसात जाण्यापूर्वी तिला जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे महिलेने उघड केले. तिने पुढे बाबरवर तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप केला. (New Zealand दौऱ्यावर गेलेल्या Pakistan संघाचे 6 सदस्य कोरोना पॉसिटीव्ह, आयसोलेशन दरम्यान होणाऱ्या सराव सत्रावरही लागले निर्बंध)

बाबरच्या खर्चासाठी तिने पैसे दिल्याचा दावाही या महिलेने केला आहे. या धक्कादायक खुलाशामुळे क्रिकेट फ्रेटर्निटी हादरून गेले आहे आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) क्रिकेटपटूविरोधात काही कारवाई करते की नाही हे पाहणे बाकी आहे. पाकिस्तानी पत्रकार साज सादिक यांनी महिलेने हे आरोप करत असल्याची क्लिप शेअर केली. "त्याने माझ्याशी लग्न करण्याचे वचन दिले. मला गरोदर केले, मला मारहाण केली, मला धमकावले आणि माझा वापर केला," असे या महिलेचे म्हणणे आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट खेळाडू मंडळाने महिलेने केलेल्या आरोपांवर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानच्या सर्व-फॉर्मेट कर्णधारपदाचा कार्यभार स्वीकारणारा बाबर सध्या टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचे सदस्य सध्या त्यांच्या 14 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करत आहे. दोन्ही संघात 18 डिसेंबरपासून मालिकेची सुरुवात होईल. मात्र, दौरा सुरु होण्यापूर्वीच संघावर संकट ओढवले आहे. सात खेळाडू कोविड-19 पॉसिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान बोर्डाकडून कोरोना पॉसिटीव्ह खेळाडू किंवा सदस्यांची नावे अद्याप जाहीर नाही झाली आहे.