
आयसीसी विश्वचषक 2023 च्या (ICC Cricket World Cup 2023) पाचव्या सामन्यात रविवारी (8 ऑक्टोबर) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलियाचे (IND vs AUS) संघ आमनेसामने येतील. दोन वेळा विश्वविजेता भारत हा जगातील नंबर वन वनडे संघ आहे, तर पाच वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघ सध्या वनडे क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता असून, विजयाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात करण्याकडे दोघांचे लक्ष असेल. भारतीय संघाची कमान रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हातात आहे, तर ऑस्ट्रेलियाची कमान पॅट कमिन्सकडे (Pat Cummins) आहे. (हे देखील वाचा: Shubman Gill Health Update: भारतासाठी चांगली बातमी, डेंग्यूने त्रस्त असलेल्या शुभमन गिलसाठी आली दिलासादायक अपडेट)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे हेड टू हेड रेकॉर्ड
एकदिवसीय सामन्यांमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आतापर्यंत 149 वेळा भिडले आहेत आणि यापैकी भारताने 56 सामने जिंकले आहेत तर ऑस्ट्रेलियाने 83 सामने जिंकले आहेत. मायदेशात, भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 70 एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि 32 जिंकले आहेत तर ऑस्ट्रेलियाने 38 सामने जिंकले आहेत. या दोन संघांदरम्यान तटस्थ ठिकाणी खेळल्या गेलेल्या 26 एकदिवसीय सामन्यांपैकी भारताने 10 तर ऑस्ट्रेलियाने 12 सामने जिंकले आहेत. या दोन संघांमधील शेवटचा सामना 27 सप्टेंबर 2023 रोजी झाला होता, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 66 धावांनी पराभव केला होता.
कधी आणि कुठे पाहणार सामना?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2.00 वाजता खेळला जाईल. तुम्ही या सामन्याचे Disney + Hotstar वर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. तसेच स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर तुम्ही भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.