Australia Women National Cricket Team vs New Zealand Women National Cricket Team 1st T20I Scorecard: यांच्यात तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मॅके येथील ग्रेट बॅरियर रीफ एरिना येथे खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडची कर्णधार सुझी बेट्स हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या 144 धावांचे ऑस्टेलियाने फोबी लिचफिल्डच्या शानदार 64 धावांच्या खेळीमुळे 5 विकेटने विजय मिळवला आहे. (हेही वाचा - England vs Australia 1st ODI Head to Head Records: पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार चुरशीची लढत, आकडेवारीत कोण आहे सरस? घ्या जाणून )
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात विशेष झाली नाही आणि अवघ्या 44 धावांवर संघाचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर सुझी बेट्स आणि मॅडी ग्रीन यांनी मिळून डाव सांभाळला. न्यूझीलंड संघाला निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 143 धावा करता आल्या. न्यूझीलंडकडून मॅडी ग्रीनने सर्वाधिक 35 धावांची खेळी खेळली. मॅडी ग्रीनशिवाय सुझी बेट्सने 33 धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे मेगन शुट, टायला व्लेमिंक, सोफी मोलिनक्स, ॲनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहम आणि हेदर ग्रॅहम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाला 20 षटकात 144 धावांचे आव्हान ठेवले होते.
पाहा पोस्ट -
1-0 to Australia 👏
Phoebe Litchfield's unbeaten half-century does it for the hosts 🎯#AUSvNZ SCORECARD: https://t.co/bACMjw46t7 pic.twitter.com/PMPohKaFYQ
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 19, 2024
20 षटकात 144 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात खराब झाली मात्र नंतर फोबी लिचफिल्डच्या 43 चेंडूत 64 धावा तर जॉर्जिया वेअरहॅमच्या 26 चेंडूच्या जोरावर 18.4 षटकांत 145 धावा केल्या.