Australia Women's National Cricket Team vs England Women's National Cricket Team,1st T20I Match 2025 Live Streaming: ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ (AUS W vs ENG W) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील पहिला सामना आज 20 जानेवारी रोजी खेळवला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.45 वाजता सिडनीतील सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत याआधी भारताने शेवटच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 86 धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली. या विजयात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू अॅशले गार्डनरने शानदार कामगिरी करत शतक झळकावले आणि संघाला एका मजबूत धावसंख्येपर्यंत नेले. या मालिकेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व एलिसा हिली करत आहे. तर इंग्लंडची कमान हीदर नाईटच्या हातात आहे.
एकदिवसीय मालिका 3-0 ने जिंकल्यानंतर, ऑस्ट्रेलिया उत्साहाने भरलेला आहे आणि 2025 ची महिला अॅशेस जिंकण्याच्या मार्गावर आहे. इंग्लंडकडे टी-20 मालिकेत स्वतःला वाचवण्याची आणि ट्रॉफी गमावण्यापासून रोखण्याची ही महतत्वाची संधी आहे.
हेड टू हेड रेकॉर्ड्स
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत 40 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या काळात ऑस्ट्रेलियन संघाने 23 सामने जिंकले आहेत. तर, इंग्लंडला फक्त 10 सामने जिंकता आले आहेत. तर, 7 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने अनिर्णीत राहिले आहेत.
सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?
ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज भारतीय वेळेनुसार दुपारी 01.45 वाजता सिडनी येथील सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येईल.
सामन्याचे लाईव्ह कुठे आणि कसे पहाल?
ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध इंग्लंड महिला टी 20 मालिका 2025 ही भारतातील मालिका स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे अधिकृतपणे प्रसारित केली जाईल. ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघातील पहिला टी 20 सामना स्टार स्पोर्ट्स टीव्ही चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाईल. यासोबतच, या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या अधिकृत ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने+हॉटस्टारवर उपलब्ध असेल. चााहते डिस्ने+हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात,
दोन्ही संघांचे खेळाडू:
ऑस्ट्रेलिया महिला संघ: एलिसा हिली (कर्णधार आणि यष्टीरक्षक), फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, बेथ मूनी, अॅनाबेल सदरलँड, ताहलिया मॅकग्रा, अॅशले गार्डनर, किम गार्थ, डार्सी ब्राउन, मेगन शट, जॉर्जिया वेअरहॅम.
इंग्लंड महिला संघ: माया बोचियर, डॅनी वायट-हॉज, नॅट सायव्हर-ब्रंट, हीदर नाईट (कर्णधार), एमी जोन्स (यष्टीरक्षक), अॅलिस कॅप्सी, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन बेल, लॉरेन फाइलर, लिन्सी स्मिथ.