ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा 2022 (Photo Credit: PTI)

Australia Tour of Pakistan 2022: ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम (Australia Cricket Team) मार्च महिन्यात 1998 नंतर पहिल्यांदा पाकिस्तान दौऱ्यावर (Pakistan Tour) जाणार आहे, पण अनेक स्टार खेळाडू या दौऱ्यातून माघार घेऊ शकतात. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड (Josh Hazlewood) बुधवारी म्हणाला की सुरक्षेच्या कारणास्तव त्याच्या काही सहकाऱ्यांनी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला तर त्याला आश्चर्य वाटणार नाही. “येथे बर्‍याच गोष्टी आहेत आणि CA व ACA ने पार्श्वभूमीत बरेच काम केले आहे. त्यामुळे खेळाडूंवर विश्वास खूप जास्त आहे, परंतु खेळाडूंकडून नक्कीच काही चिंता असेल आणि त्यांच्यापैकी काहींनी दौरा केला नाही तर मला आश्चर्य वाटणार नाही,” cricket.com.au ने हेझलवुडला उद्धृत केले.

मात्र पाकिस्तान दौरा सुरू होण्याच्या काही दिवस आधी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेल्झवूडने या दौऱ्यात सहभागी होण्याबाबत मत व्यक्त केले आहे. “आणि ते खूप न्याय्य आहे. लोक त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करतील आणि निर्णय घेतील व प्रत्येकजण त्याचा आदर करेल,” तो पुढे म्हणाला. पाकिस्तान दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया तीन कसोटी, तीन वनडे आणि एक टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिके खेळेल. कराची (3-7 मार्च), रावळपिंडी (मार्च 12-16), आणि लाहोर (21-25 मार्च) येथे तीन कसोटी सामने होणार आहेत, तर लाहोर येथे 29 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत चार व्हाईट-बॉल सामने खेळणार आहे. तीन सामन्यांची कसोटी मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदचा भाग असेल, तर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळली जाईल.

लक्षात घ्यायचे की मार्क टेलरच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने अखेर 1998 मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यामुळे सर्वकाही सुरळीत राहिल्यास 24 वर्षानंतर ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तानला जाईल. राष्ट्रीय निवडकर्ता जॉर्ज बेली यांनी सुरक्षा योजना अतिशय मजबूत असल्याचे सांगितले आहे. याशिवाय, गेल्या वर्षीही टी-20 विश्वचषकपूर्वी न्यूझीलंड आणि इंग्लंड संघांनी सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली होती. त्यानंतर न्यूझीलंडने ऐन सामन्यापूर्वी माघार घेण्याचा निर्णय घेतला.