Australia Cricket Team: वेस्ट इंडिज-बांग्लादेश दौऱ्यातून आरोन फिंच याची एक्सिट, टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का
आरोन फिंच (Photo Credit: Getty)

Australia Cricket Team: ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित ओव्हर संघाचा कर्णधार आरोन फिंच (Aaron Finch) वेस्ट इंडिजच्या (West Indies) उर्वरित व बांग्लादेशच्या (Bangladesh) आगामी दौऱ्यातून बाहेर पडला आहे. फिंचच्या गुडघ्याला दुखापत (Finch Injury) झाल्यामुळे त्याने दौऱ्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. फिंच 14 दिवसांचा क्वारंटाईन पूर्ण करण्यासाठी वेस्ट इंडीज हून ऑस्ट्रेलियासाठी रवाना होईल आणि त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात सुरु होणाऱ्या टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेसाठी फिंचची वेळ ठीक होईल यासाठी निवड समिती आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया वैद्यकीय संघ आशावादी आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिकेच्या सेंट लुसिया (St Lucia) येथे सरावाच्या दरम्यान फिंचला दुखापत झाली होती. या मालिकेच्या अंतिम सामन्यात त्याने आणखी चिघळले. (BAN vs AUS Series 2021: बांगलादेश दौर्‍यावर पाच टी -20 सामने खेळणार ऑस्ट्रेलिया संघ, पाहा संपूर्ण वेळापत्रक)

फिंचने एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकात सांगितले की, “मी घरी जात असताना खूप निराश आहे. बांग्लादेशसाठी प्रवास करणे, खेळण्यास सक्षम नसणे आणि पुनर्प्राप्तीची वेळ गमावण्याऐवजी ही सर्वोत्कृष्ट कृती मानली जात आहे. गरज पडल्यास मी शस्त्रक्रिया करेन आणि विश्वचषक होण्यापूर्वी पुनर्प्राप्ती प्रक्रिया सुरू करेन,” फिंचने म्हटले. दरम्यान, फिंचच्या अनुपस्थितीत अ‍ॅलेक्स कॅरी बार्बाडोस येथील अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाची धुरा सांभाळेल. आता निवड समितीपुढे ढाका येथे बांग्लादेशविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेपूर्वी कर्णधाराबाबत सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 सामन्यांसाठी मॅथ्यू वेडला संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. फिंचची दुखापत हा ऑस्ट्रेलियाला शोपीस इव्हेंटआधी एक मोठा धक्का मानला जातात आहे आणि निवड समितीने आशा व्यक्त केली आहे की तो लवकरच पुनरागमन करेल.

विंडीज दौऱ्याबाबत बोलायचे तर सध्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत आहेत आणि मालिकेचा तिसरा व निर्णायक सामना सोमवारी खेळला जाईल. यापूर्वी टी-20 मालिकेत विंडीजने कांगारू संघाचा 1-4 असा पराभव केला होता. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाला बांग्लादेश दौर्‍यावर पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी रवाना होईल. टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी ही मालिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे.