Australian Men's National Cricket Team vs India National Cricket Team: ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND s AUS) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 (Border-Gavaskar Trophy 2024-25) मालिकेतील चौथा बॉक्सिंग डे कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. 3 सामन्यांनंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. पहिला सामना भारताने जिंकला, तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर गाब्बामध्ये सामना अनिर्णित राहिला. दरम्यान, पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने दिवसाअखेर 6 विकेट गमावून 311 धावा केल्या आहे. स्टीव्हन स्मिथ 68 तर पॅट कॅमिन्स 8 धावांवर नाबाद आहे. तर भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या आहे.
Australia started with a bang, India finish with a boom 👏
An action-packed opening day at the MCG 🍿
🔗 https://t.co/ycgxNhumqw | #AUSvIND pic.twitter.com/EmOuFNmLa3
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 26, 2024
स्टीव्हन स्मिथ 68 धावांवर नाबाद
त्याआधी, ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 4 फलंदाजांच्या अर्धशतकांच्या जोरावर 311 धावा केल्या. सॅम कॉन्स्टास आणि उस्मान ख्वाजा यांनी ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर उस्मान ख्वाजा 57 धावा करून बाद झाला. मार्नस लॅबुशेन 72 धावा करून बाद झाला. स्टीव्हन स्मिथ 68 तर पॅट कॅमिन्स 8 धावांवर नाबाद आहे.
हे देखील वाचा: Sam Konstas आणि Virat Kohli चा वाद पडू शकतो महागात, दोघांवर होऊ शकते कठोर कारवाई; जाणून घ्या काय सांगतो ICC चे नियम
जसप्रीत बुमराहने घेतले 3 बळी
भारताकडून जसप्रीत बुमराहने 3 तर आकाश दीप, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने पहिल्या दिवसाच्या खेळात प्रत्येकी 1 बळी घेतला. आता दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजानां कांगारुना लवकरात लवकर आऊट करण्याचे लक्ष्य असेल. दुसऱ्या दिवसाचा खेळाला भारतीय वेळेनुसार सकाळी 5.00 वाजता सुरुवात होईल.