Australia National Cricket Team vs Pakistan National Cricket Team 2nd T20I Match 2024 Scorecard: ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज सिडनीतील सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान संघाचा 29 धावांनी पराभव केला आहे. यासह ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाची कमान जोश इंग्लिसच्या खांद्यावर आहे. तर पाकिस्तानचे नेतृत्व मोहम्मद रिझवानकडे आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने विजयासाठी पाकिस्तानसमोर 148 धावांचे लक्ष्य ठेवले होते.  (हेही वाचा  -  Australia vs Pakistan, 2nd T20I 1st Inning Scorecard: हरिस रौफच्या घातक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ढेपाळले, पाकिस्तानला मिळाले 148 धावांचे लक्ष्य )

ऑस्ट्रेलियन कर्णधार जोश इंग्लिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियन संघाला निर्धारित 20 षटकात 9 विकेट गमावून केवळ 147 धावा करता आल्या.

. या स्फोटक खेळीदरम्यान मॅथ्यू शॉर्टने अवघ्या 17 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकार ठोकले. मॅथ्यू शॉर्टशिवाय ॲरॉन हार्डीने 28 धावांची खेळी खेळली.

हरिस रौफने पाकिस्तान संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज हारिस रौफने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. हरिस रौफशिवाय अब्बास आफ्रिदीने तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी पाकिस्तान संघाला 20 षटकात 148 धावा करायच्या होत्या.

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 17 धावांवर संघाचे दोन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. पाकिस्तानचा संपूर्ण संघ 19.4 षटकात केवळ 134 धावांवर गारद झाला. पाकिस्तानकडून उस्मान खानने 52 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान उस्मान खानने 38 चेंडूत चार चौकार आणि एक षटकार ठोकला. उस्मान खानशिवाय इरफान खानने नाबाद 37 धावा केल्या.

झेवियर बार्टलेटने ऑस्ट्रेलियन संघाला पहिले यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाकडून वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सनने सर्वाधिक ५ बळी घेतले. स्पेन्सर जॉन्सनशिवाय ॲडम झाम्पाने दोन बळी घेतले. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना सोमवार, 18 नोव्हेंबर रोजी बेलेरिव्ह ओव्हल, होबार्ट येथे दुपारी 1.30 वाजता खेळवला जाईल.