Australia National Cricket Team vs Pakistan National Cricket Team 2nd T20I Match 2024 Scorecard: ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज सिडनीतील सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान संघाचा 29 धावांनी पराभव केला आहे. यासह ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाची कमान जोश इंग्लिसच्या खांद्यावर आहे. तर पाकिस्तानचे नेतृत्व मोहम्मद रिझवानकडे आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने विजयासाठी पाकिस्तानसमोर 148 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. (हे देखील वाचा: ENG vs WI 4th T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या T20 मध्ये इंग्लंड विजयाची मालिका कायम ठेवणार, हेड टू हेड रेकॉर्ड, सामन्यापूर्वी लाईव्ह स्ट्रिमींगबाबत घ्या जाणून)
Led by Haris Rauf and Abbas Afridi, Pakistan restrict Australia to 147 after a start that looked like a bowler's nightmare
Live: https://t.co/LA5xJrxsV2 | #AUSvPAK pic.twitter.com/jr0cX6YdsY
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 16, 2024
पहिल्या डावाचे स्कोअरकार्ड येथे पहा
त्याआधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जोश इंग्लिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियन संघाला निर्धारित 20 षटकात 9 विकेट गमावून केवळ 147 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर मॅथ्यू शॉर्टने सर्वाधिक 32 धावांची खेळी खेळली. या स्फोटक खेळीदरम्यान मॅथ्यू शॉर्टने अवघ्या 17 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकार ठोकले. मॅथ्यू शॉर्टशिवाय ॲरॉन हार्डीने 28 धावांची खेळी खेळली.
हारिस रौफची घातक गोलंदाजी
हरिस रौफने पाकिस्तान संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज हारिस रौफने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. हरिस रौफशिवाय अब्बास आफ्रिदीने तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी पाकिस्तान संघाला 20 षटकात 148 धावा करायच्या आहेत. हा सामना जिंकून पाकिस्तान संघाला मालिकेत पुनरागमन करायचे आहे.