AUS-W vs SL-W 3rd ODI: ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची ऐतिहासिक कामगिरी, सलग 18 वनडे जिंकत केला वर्ल्ड रेकॉर्ड
ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका महिला क्रिकेट संघ (Photo Credit: Getty)

ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने श्रीलंकाविरुद्ध सलग तिसऱ्या वनडे मॅचमध्ये विजय मिळवाल आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियन संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकाविरुद्ध क्लीन-स्वीप मिळवला आणि वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. श्रीलंकाविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यातील विजय हा ऑस्ट्रेलिया महिला संघाचा वनडेमधील सलग 18 वा होता. तिसऱ्या सामन्यात पहिले फलंदाजी करत श्रीलंकाने 50 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 196 धावांचे लक्ष्य दिले होते. आणि ऑस्ट्रेलियाने ते लक्ष्य 26.5 ओव्हरमध्ये 1 फक्त विकेट गमावून पूर्ण केले. आजच्या मॅचमध्ये एलिसा हीली (Alyssa Healy) ने नाबाद 112 धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा निभावला. तर, श्रीलंकासाठी चमारी अटापट्टू ने शतक केले. (ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हेली ने कर्णधार मेग लॅनिंग चा रेकॉर्ड मोडत श्रीलंकाविरुद्ध टी-20 मध्ये केला 'हा' वर्ल्ड रेकॉर्ड)

दुसरीकडे, सोमवारी ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात 110 धावांनी विजय मिळवत सलग 17 व्या विजयाची नोंद केली. यापूर्वी, 1997 ते 1999 या काळात ऑस्ट्रेलियाच्या संघाने बेलिंड क्लार्क च्या नेतृत्वात महिला क्रिकेटमध्ये सलग 17 वनडे सामने जिंकण्याचा विश्वविक्रम केला होता. याविजयासह, कर्णधार मॅग लॅनिंग च्या संघाने विश्वविक्रम आपल्या नावावर केला. ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर आलेल्या श्रीलंकाविरुद्ध घरच्या संघाने मालिकेत विजय मिळवला. पहिला वनडे ऑस्ट्रेलियाच्या संघाने 157 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 281 धावांचे लक्ष्य दिले होते आणि नंतर, श्रीलंकेच्या संघाला अवघ्या 124 धावांवर बाद केले.

दरम्यान, दुसऱ्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने 282 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेला 9 विकेट्सवर 172 धावाच करता आल्या. आता महिला संघ त्यांच्या पुरुष संघाने 2003 मध्ये केलेल्या वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याच्या निर्धारित असेल, जेव्हा संघ पुढील वर्षी मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाईल.