ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान (Photo Credit: Twitter)

माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) याच्या तिसऱ्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया (Australia) संघाने दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये पाकिस्तानला (Pakistan) 7 विकेटने पराभूत केले. या सामन्यात स्मिथने नाबाद 80 धावा केल्या. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता, त्यामुळे सर्वांचे लक्ष यंदाच्या दुसऱ्या मॅचवर होते. जगातील पहिल्या क्रमांकाच्या टी-20 फलंदाज बाबर आजम (Babar Azam) याच्यासाठी हा सामना खूप खास होता. पाकिस्तानच्या टी-20 संघाची कमान सांभाळण्यास बाबरचा हा पहिला सामना होता, पण पहिल्याच सामन्यात अशा पराभवाची नवीन पाकिस्तानी कर्णधारालाही अपेक्षा नव्हती. सामन्याच्या सुरूवातीला आपल्या संघाची स्थिती पाहून तो खूप निराश झाला, ज्याचा राग त्याने मॅचदरम्यान स्वतःच्या साथीवर व्यक्त केला. (AUS vs SL 1st T20I: स्टीव्ह स्मिथ याने एरोन फिंच याला पॅट कमिन्स याच्या Hat-Trick ची करून दिली आठवण, पाहा 'हा' मजेदार Video)

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु पॉवर प्लेमधील पाच ओव्हरमध्ये पाकिस्तानने त्यांच्या दोन विकेट गमावल्या. बाबर एका टोकाला संभाळून फलंदाजी करत होत, तर दुसरीकडे विकेट पडण्याचे सत्र सुरूच होते. कर्णधार म्हणून हे सर्व पाहून बाबर निराश झाला. अशा परिस्थितीत आसिफ अली (Asif Ali) त्याला साथ देण्यासाठी मैदानात आला. आसिफची विकेट पडण्याआधी बाबरने लॉन्ग ऑनच्या दिशेने एक लांब चेंडू मारला आणि त्यावर त्याला दोन धावा घ्यायची होती, पण आसिफने दुसरा धावा घेण्यास नकार दिला. यावर बाबर भडकला आणि त्याने मैदानातच असिफला राग व्यक्त केला. याच्यानंतर, 12 व्या ओव्हरमध्ये अॅश्टन अगर याच्या एका चेंडूवर त्याने स्लॉग स्‍वीप शॉट खेळण्याचा प्रयत्नात आपली विकेट गमावली. अली चा हा खराब शॉट पाहून कर्णधार बाबर भडकला. पहा हा व्हिडिओ:

पहिले फलंदाजी करत पाकिस्तानने यजमान ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 151 धावांचे लक्ष्य दिले आणि ऑस्ट्रेलियाने तीन गडी गमावून आणि नऊ चेंडू आधीच विजय मिळवला. पाकिस्तानकडून बाबर आझमने 50 आणि इफ्तिखार अहमद याने नाबाद 65 धावा केल्या. इफ्तिखारने 34 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार लगावले.