AUS vs PAK 1st Test: ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट खेळणारा नसीम शाह बनला सर्वात युवा क्रिकेटपटू, कसोटी कॅप मिळताच झाले अश्रू अनावर, पाहा Video
नसीम शाह (Photo Credit: Twitter/@ESPNcricinfo)

युवा गोलंदाज नसीम शाह (Naseem Shah) याचा पाकिस्तान (Pakistan) कडून कसोटी सामने खेळणार्‍या युवा क्रिकेटपटूंच्या यादीत समावेश झाला आहे. पाकिस्तानी कर्णधार अझर अली याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया (Australia) संघाविरुद्ध आजपासून सुरु झालेल्या टेस्ट मालिकेतून 16 वर्षीय नसीमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. नसीमच्या आईचे गेल्या आठवड्यात निधन झाले होते, परंतु त्याने दौऱ्यावर टीमसोबतच राहण्याचा निर्णय घेतला. पर्थमध्ये ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध 8 ओव्हर टाकत प्रभावित केले. नसीम ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या टेस्टमध्ये टेस्टमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व करेल यावर मागील काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. आणि आता ऑस्ट्रेलियामध्ये आपला पहिला सामना खेळत नसीमने एक विशेष कामगिरीची नोंद केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पुरुष कसोटी खेळणारा इतिहासातील सर्वात युवा खेळाडू बनला आहे. नसीमने 16 वर्ष 297 दिवसांचा असताना ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट डेब्यू केले आहेत. (AUS Vs PAK Test 2019: डेनिस लिली आणि शेन बॉण्ड शी तुलना झालेला 16 वर्षीय नसीम शाह डेब्यूसाठी सज्ज, मालिकेआधी ऑस्ट्रेलियाई खेळाडूंच्या आणले नाकी-नऊ)

वयाच्या 16 व्या वर्षी क्वचित खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे, ज्यात भारतीय दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचाही समावेश आहे. सचिनने वयाच्या 16 व्या वर्षी नोव्हेंबर 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्ध सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सर्वात कमी वयात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या हसन रझा यांच्या नावावर आहे. वयाच्या 14 वर्ष आणि 227 दिवसांनी त्यांनी डेब्यू केला होता. 1996 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध पाकिस्तानच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला होता. दरम्यान, मॅचपूर्वी कसोटी कॅप सादरीकरणात नसीमला त्याचे अश्रू अनावर झाले. मॅच सुरु होण्यापूर्वी वकार युनूस यांनी नसीमला त्याची पहिली टेस्ट कॅप दिली, ज्यानंतर त्याच्या भावनांवर त्याचा ताबा राहिला नाही आणि त्याला रडू फुटले.

नसीमला मिळाली पहिली टेस्ट कॅप

मागील वर्षी सप्टेंबरमध्ये नसीमने लाहोरकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रवेश केला होता. त्याने आजवर फक्त सहा प्रथम श्रेणी सामने खेळले असून नसीमने 16.50 च्या सरासरीने 26 विकेट घेतले आहेत.