नसीम शाह (Photo Credit: Getty Images)

मागील आठवड्यातच त्याच्या आईचे निधन झाले, परंतु पाकिस्तानी वेगवान गोलंदाज नसीम शाह (Naseem Shah) हे दुःख विसरून तिचे स्वप्न पूर्ण करण्यास तयार आहे. टी-20 मालिकेत पराभूत झाल्यानंतर आता पाकिस्तानचा (Pakistan) संघ गुरुवारपासून ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेसाठी सज्ज होत आहे. पहिली कसोटी ब्रिस्बेन मैदानावर होणार आहे. संघाचा प्रशिक्षक मिसबाह उल हक याला 16 वर्षाचा वेगवान गोलंदाज नसीम शाह याच्याकडून बऱ्याच आहे आहे आणि त्यांना वाटते की हा गोलंदाज ऑस्ट्रेलियाई फलंदाजांच्या नाकी नऊ आणू शकतो. आणि ते त्याने सराव सत्रादरम्यान सिद्धही केले. डेनिस लिली आणि न्यूझीलंडचा महान गोलंदाज शेन बॉण्ड यांच्याशी तुलना झालेला नसीम पाकिस्तानकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.

या गोलंदाजाचे वय केवळ 16 वर्षे आहे, परंतु त्याच्या चेंडूचे वेग आणि अचूक गोलंदाजी पाहण्यासारखे आहेत. त्याने शानदार गोलंदाजी केली आणि ऑस्ट्रेलिया अ संघाच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणले. या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाज नसीमच्या गोलंदाजीसमोर गुडघे टेकलेले दिसले. नसीमने आपल्या वेगवान गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलिया अ फलंदाज मार्कस हॅरिस (Marcus Harris) आणि उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) यांना चांगलेच अडचणीत आणले. नसीमच्या चेंडूचा सामना करताना या दोन्ही फलंदाजांना खूप त्रास सहन करावा लागला. नसीमने एका सुंदर चेंडूवर ख्वाजाला पॅव्हिलिअनचा मार्ग दाखवला. सरावादरम्यानचा नसीमचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. पाहा नसीमच्या गोलंदाजीचे हे नमुने:

उस्मान ख्वाजा

नसीमची शैली माजी न्यूझीलंड गोलंदाज शेन बॉन्ड सारखीच आहे

16 वर्षीय नसीम शाह ऑस्ट्रेलिया अ टॉप ऑर्डरविरुद्ध

अवघ्या 16 वर्षीय नसीमला वेगवान गोलंदाज म्हणून पाकिस्तानकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडले आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये नसीमने लाहोरकडून प्रथम श्रेणीमध्ये प्रवेश केला होता. नसीमने सहा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 16.50 च्या सरासरीने 26 विकेट घेतले आहेत. जर नसीमने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले तर तो कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा नववा सर्वात युवा खेळाडू असेल. एवढेच नाही तर ऑस्ट्रेलियात आंतरराष्ट्रीय क्रिकेटसर्वात युवा वयात खेळण्याचा विक्रमही नसीम नोंदवेल.