आयसीसी T20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 च्या विजेतेपदाच्या लढतीत आज ऑस्ट्रेलिया (Australia) आणि न्यूझीलंड (New Zealand) आमनेसामने आहेत. ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा तर किवी संघ पहिल्यांदा वर्ल्ड कपमध्ये (World Cup) क्रिकेटच्या सर्वात छोट्या स्वरूपाचा अंतिम सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाने 2010 मध्ये फायनलमध्ये प्रवेश केला, परंतु त्यावेळी इंग्लंड चॅम्पियन बनण्यात यशस्वी ठरला. ऑस्ट्रेलियाने 5 वेळा एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे, परंतु आजपर्यंत टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद काबीज करता आलेले नाही. अशा परिस्थितीत हा दुष्काळ संपवण्यासाठी कांगारूंचा संघ प्रयत्न करणार आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडने वनडे आणि टी-20 विश्वचषक स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे, परंतु संघाला ट्रॉफी जिंकण्यात अपयश आले आहे. मात्र, किवी संघाने यंदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकून आपली ताकद दाखवून दिली आहे. अशा स्थितीत विल्यमसन ब्रिगेडचे मनोबल उंचावेल आणि ऑस्ट्रेलियन कॅम्पला सावध राहण्याची गरज आहे. (NZ vs AUS Final, ICC T20 World Cup 2021: ‘या’ तीन खेळाडूंमधील आमना-सामना ठरवेल कोण बनणार टी-20 चा जगज्जेता)
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना दुबईच्या दुबई क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. तर सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल. भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात. ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामना स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी एचडी, स्टार स्पोर्ट्स 2, स्टार स्पोर्ट्स 2 एचडी वर थेट पाहण्यास उपलब्ध असेल. तसेच ऑनलाईन डिस्नी + हॉटस्टार अॅपवर या सामन्याचे थेट स्ट्रीमिंग पाहू शकतात.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे संघ पुढीलप्रमाणे आहेत
ऑस्ट्रेलिया: आरोन फिंच (कॅप्टन), डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, मिचेल स्वीपसन, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), अॅश्टन अगर, पॅट कमिन्स, जोश इंग्लिस, अॅडम झाम्पा जोश हॅझलवुड.
न्यूझीलंड: केन विल्यमसन (कॅप्टन), मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, टोड अॅस्टल, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, टिम सेफर्ट (विकेटकीपर), अॅडम मिल्ने, काइल जेमिसन, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, टिम साऊदी, मिचेल सँटनर, ईश सोढी.