AUS vs NZ 1st Test: मार्नस लाबुशेन याने कसोटी सामन्यात लगावले सलग तिसरे शतक, डॉन ब्रॅडमन यांच्या स्पेशल क्लबमध्ये झाला सामील
मार्नस लाबुशेन (Photo Credit: AP/PTI)

ऑस्ट्रेलियाचा (Australia) युवा फलंदाज मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) याने गुरुवारी सलग तिसरे कसोटी शतक झळकावले. लाबुशानेने गुरुवारी न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध पहिल्या टेस्ट सामन्यात नाबाद 110 धावांची खेळी केली. यासह, आपला 12 वा कसोटी सामना खेळणार्‍या लाबुशेनने अनेक विक्रम नोंदविले आणि सर डॉन ब्रॅडमन (Don Bradman) यांच्यासारख्या दिग्गजांच्या स्पेशल क्लबमध्ये सामील झाला. त्याच्या शानदार खेळीच्या जोरावर न्यूझीलंडविरुद्ध डे-नाईट टेस्टच्या पहिल्या दिवशी यजमानांनी 4 बाद 248 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा लाबुशेनसह ट्रॅव्हिस हेड (Travis Head) 20 धावांवर खेळत होता. लाबुशानेसह तिसऱ्या विकेटसाठी माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) याने 132 धावांची भागीदारी केली. त्याने 202 चेंडूंत 14 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 110 धावा केल्या आहेत. (AUS vs NZ 1st Test: पर्थ कसोटीत टीम साउदी याचा आक्रामक अंदाज, जो बर्न्स याला फेकून मारला चेंडू, पाहा Video)

ऑस्ट्रेलियासाठी सलग तिसरे शतक झळकावणारा लाबुशेन सहावा फलंदाज बनला आहे. 1963 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध तीन आणि इंग्लंडविरूद्ध एक शतक ठोकणार्‍या ऑस्ट्रेलियासाठी जॅक फिंगल्टन यांनी सलग 4 सर्वाधिक शतकं केली आहेत. याशिवाय वॉरेन बर्डस्ले, चार्ल्स मॅकार्टनी, आर्थर मॉरिस आणि डॉन ब्रॅडमन यांनी सलग तीन शतकं लगावली आहेत. लाबुशेनच्या रुपात कांगारू संघाला एक चांगला फलंदाज मिळाला आहे जो मध्यक्रमात सतत संघासाठी धावा करत आहे.लाबूशानेने पाकिस्तानविरुद्ध मॅचमधून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, पण पहिल्या डावात शून्यावर बाद झाला. पण, पुन्हा याच प्रतिस्पर्धीविरुद्ध ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यानलाबूशानेने दोन टेस्ट सामन्यात शतकी खेळी केली.

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या सामन्यात टॉस जिंकून पहिले फलंदाजीसाठी ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज डेव्हिड वॉर्नर 43 तर जो बर्न्स 9 धावांवर बाद झाला. यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत लाबुशेनने डाव सावरला आणि नाबाद 110 धावा केल्या. पहिल्या दिवशी स्टीव्ह स्मिथ 43 आणि मॅथ्यू वेड 12 धावांवर माघारी परतले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत लाबुशेन 110 आणि ट्रेव्हिड हेड 20 धावाांसह खेळत आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने चार बाद 248 धावा केल्या आहेत.