आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकमध्ये आज ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध इंग्लंड (England) संघात सेमीफायनलचा थरार रंगला आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्यांच्याच जिव्हारी लागला. फलंदाजीसाठी आलेल्या डेविड वॉर्नर (David Warner) आणि एरोन फिंच (Aaron Finch) यांच्या रूपात संघाला मोठा फटका बसला. जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याने आपल्या दुसऱ्याच ओव्हरवर फिंचला शुन्यावर बाद केले. तर, वॉर्नर 10 धावांवर बाद झाला. तर, सहाव्या ओव्हरमध्येच पीटर हैंड्सकॉम्ब (Peter Handscomb) बाद झाला. त्यानंतर फलंदाजी करायला आलेल्या विकेटकीपर ऍलेक्स केरी (Alex Carry). केरीबरोबर असे काही घडले की तिथे उपस्थित सगळ्यांच्या हृदयाचा ठोकाच बसला. (भारतीय संघाचा पराभव जिव्हारी लागला; MS Dhoni रनआउट झाल्याच्या धक्क्याने चाहत्याचा जागीच मृत्यू)
आर्चर यांच्या तिसऱ्या ओव्हरमधील एक कॅरीसाठी प्राणघातक ठरला आणि त्याला दुखापत झाली. आर्चर याचा बाउन्सर थेट कॅरीच्या हेल्मेटवर आदळला. हा चेंडू इतक्या वेगाने आदळला की हेल्मेट डोक्यातून उडून पडले. चेंडू हनुवटीला लागल्याने कॅरीला जखम झाली आणि रक्त देखील निघायल लागले. हे पाहताच इंग्लंडचे सांगळे क्रिकेटपटू आणि सह खेळाडू स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) त्याच्या मदतीला धावून आले. ऑस्ट्रेलियाच्या फिजीओ ने ताबडतोब कॅरीच्या चेहऱ्यावरून रक्त साफ करत त्याच्यावर बॅन्डेज लावले. तरीही त्यातून रक्तस्राव सुरू होता.
Alex Carey injured but still Playing 👌#ENGvAUS pic.twitter.com/giY3ojh0xg
— Syed Atif (@_SmokeDream_) July 11, 2019
दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात तब्बल 44 वर्षांनी सेमीफायनलचा सामना खेळला जात आहे. दोन्ही संघ 1975मध्ये एकमेकांविरोधात भिडले होते. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये एकही सामना गमावलेला नाही. तर इंग्लंड 1992 नंतर पहिल्यांदा सेमीफायनलमध्ये उतरली आहे. दोन्ही संघांना सध्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे.