एम एस धोनी (Photo Credit : File Image)

काल भारत विरुद्ध न्यूझीलंड असा पहिला सेमीफायनल (India Vs New Zealand Semifinal) सामना पार पडला. भारतावर 18 धावांनी विजय मिळवून न्यूझीलंडने फायनलमध्ये प्रवेश मिळवला. पहिल्यापासून आघाडीवर असलेल्या भारतीय संघाचा हा पराभव तमाम भारतीयांसाठी धक्कादायक ठरला आहे. त्यात धोनीचे (MS Dhoni) रनआउट होणे हे कित्येक चाहते पचवू शकले नाहीत. अशात धोनी आउट झाल्यानंतर एका चाहत्याचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. श्रीकांत मैती असे या चाहत्याचे नाव असून, ते कोलकाता (Kolkata) येथील रहिवासी होते.

तर त्यावेळी भारताला जिंकण्यासाठी 10 चेंडूत 24 धावांची गरज होती. धोनी स्ट्राइकवर होता, त्याने फटका लगवल्यावर दुसरी धाव काढताना गुप्टिलचा थ्रो थेट स्टम्पवर लागला. धोनी रन आउट झाला आणि चाहत्यांमध्ये निराशा पसरली. याचवेळी श्रीकांत हा सामना आपल्या सायकलच्या दुकानात पाहत होते. धोनी बाद झाल्याचा हा धक्का श्रीकांत पचवू शकले नाहीत आणि हे पाहून ते जमिनीवर कोसळले. काही लोकांनी त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केळे, मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (हेही वाचा: मॅचमधील एम एस धोनीचा हा व्हिडिओ पाहताच प्रत्येक भारतीय चाहत्यांचे अश्रू अनावर होतील, पहा हा इमोशनल Video)

दरम्यान भारत हा सामना हरल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी तसेच बॉलिवूडमधील अनेक मंडळींनी आपली निराशा आणि दुःख व्यक्त केले. तसेच भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांनीही धोनीच्या निवृत्तीवर ट्विट करत, निवृत्तीचा विचार डोक्यातून काढून टाकावा असा सल्ला दिला आहे.