AUS vs ENG, Ashes 2021-22: ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड (England) यांच्यात सुरु असलेल्या अॅशेस मालिकेला (Ashes Series) कोरोनाचा फटका बसला आहे. इंग्लंडच्या कॅम्पमध्ये सात कोविड पॉझिटिव्ह प्रकरणे आल्यानंतर आता सामनाधिकारी डेविड बून (David Boon) देखील कोराना पॉझिटिव्ह आढळले आहेत आणि त्यामुळे ते सिडनी (Sydney) येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात भाग घेणार नाहीत. त्यांच्या जागी स्टीव्ह बर्नार्ड (Steve Bernard) मॅच रेफ्रीची भूमिका निभावणार आहेत. डेविड बून यांना कोरोनाची लागण होण्यापूर्वी, इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड चौथ्या कसोटी सामन्यात नसल्याची बातमी आली होती कारण त्यांना त्यांच्या कुटुंबासमवेत क्वारंटाईन ठेवण्यास सांगितले आहे. (AUS vs ENG, Ashes 2021-22: ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी David Warner याचा सल्ला, इंग्लंडने 0-3 ने गमावली आहे मालिका)
इंग्लंड कॅम्पमध्ये कोरोना संसर्गाची सात प्रकरणे समोर आल्यानंतर प्रशिक्षक सिल्व्हरवुड क्वारंटाईन राहतील आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या अॅशेस कसोटी दरम्यान संघासोबत सिडनीला प्रवास करणार नाही. दरम्यान ब्रिटिश संघातील कुटुंबातील सदस्याला कोरोनाची लागण झाल्याची कोणतीही चिन्हे नसली तरी सिल्वरवुड यांना आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे. तिसरी कसोटी खेळल्या गेलेल्या मेलबर्नमध्ये त्यांना दहा दिवस कुटुंबासह एकांतवासात राहणार आहे. दोन्ही संघात आता चौथा कसोटी सामना 5 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. सर्व खेळाडू आणि कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय तसेच सामना अधिकारी सोमवारपासून दररोज पीसीआर टेस्ट घेत असून इंग्लंडच्या शिबिरातील चार लोकांची रॅपिड अँटिजन टेस्ट सकारात्मक चाचणी आली.
इंग्लंडने तीनही कसोटी गमावल्या असून यजमान ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. बुधवारी कुटुंबातील सदस्याचा तपास अहवाल आला असल्याचे इंग्लंडने सांगितले. जो रूटचा ब्रिटिश संघ शुक्रवारी सिडनीला रवाना होणार आहे, दोन्ही संघ चार्टर्ड फ्लाइटने सिडनीला रवाना होणार असून त्यांच्यासाठी संपूर्ण हॉटेल आरक्षित करण्यात आले आहे. दरम्यान बून असिम्प्टोमॅटिक आहेत आणि बूस्टरसह त्यांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे व 14 जानेवारी रोजी होबार्टमध्ये पाचव्या कसोटी सामन्यासाठी परतण्याची अपेक्षा आहे. हा सामना गुलाबी चेंडूने दिवस/रात्र खेळला जाणार आहे.