बुधवारी आयसीसीच्या बैठकीत यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपचे भविष्य निश्चित होण्याची अपेक्षा असताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आशिया कपचे (Asia Cup) आयोजन करण्याचा हट्ट सोडल्याच दिसत आहेत. यावर्षी आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा खेळणार की नाही याबाबत आशियाई क्रिकेट कौन्सिलने (Asian Cricket Council) आपला निर्णय पुढे ढकलला आहे. दुसरीकडे, श्रीलंकेने (Sri Lanka) या स्पर्धेचे आयोजन करण्याचा प्रस्ताव देत यजमान पाकिस्तानने यावर सहमती दर्शविली असल्याचा दावा केला आहे. यावर्षी होणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन श्रीलंका करू शकेल असे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि एसीसीने (ACC) मान्य केले आहे, असा दावा श्रीलंका क्रिकेट प्रमुख शमी सिल्वा यांनी केला आहे. आशिया चषक 2020 सप्टेंबरमध्ये होणार आहे. यावेळी आशिया चषक पाकिस्तान आयोजित करणार आहे, परंतु तेथे खेळायला जाण्यास भारताने सुरक्षेच्या कारणास्तव आधीच खेळण्यास नकार दिला आहे. (Asia Cup 2020: आशिया कप आयोजनाबाबत संभ्रम कायम, ACC च्या बैठकीत अद्याप कोणताही निर्णय नाही)
दरम्यान, नुकत्याच झालेल्या एशियन क्रिकेट कौन्सिलच्या (एसीसी) बैठकीत पीसीबीने श्रीलंका क्रिकेटला (एसएलसी) स्पर्धेचे आयोजन करण्यासंबंधी सहमती दर्शविली आहे. एसएलसीचे प्रमुख सिल्वा यांनी श्रीलंकेच्या माध्यम सेलेन टुडेला सांगितले की, “पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (पीसीबी) आमच्याशी चर्चा झाली आहे आणि सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे आम्ही आवृत्तीचे आयोजन करण्यास तयार झाले आहेत.” सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी श्रीलंकेला हिरवा कंदील मिळाला आहे असा दावाही त्यांनी केला.
नुकत्याच झालेल्या एसीसीच्या बैठकीत संभाव्य स्थळांवर चर्चा झाली. बैठकीत बीसीसीआयने स्पष्ट केले की भारतीय टीमने पाकिस्तानमध्ये खेळणे शक्य नाही. कोविड-19 प्रसारामुळे बऱ्याच क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, मात्र आशिया चषकचे नियोजित वेळी आयोजन होण्याची शक्यता आतापर्यंत दिसत आहे. दरम्यान, बुधवारी आयसीसीने टी -20 वर्ल्डकपच्या स्थितीविषयी अंतिम निर्णय घेतल्यास पुढील एसीसीच्या बैठकीत आशिया चषक स्पर्धेचे भाग्य निश्चित होण्याची अपेक्षा आहे.