Asia Cup 2020: गोंधळात गोंधळ! PCB ने फेटाळला सौरव गांगुली यांचा आशिया चषक रद्द झाल्याचा दावा, बोर्ड अध्यक्ष एहसान मनी यांनी केले 'हे' विधान
सौरव गांगुली, एहसान मनी (Photo Credit: Getty)

भारतीय क्रिकेट बोर्ड अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी बुधवारी सप्टेंबर महिन्यात आयोजित होणारी आशिया चषक टी-20 स्पर्धा रद्द झाल्याचा दावा केला ,मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) अध्यक्ष एहसान मनी (Ehsan Mani) यांनी हा दावा फेटाळून लावला ज्यामुळे या स्पर्धेच्या आयोजनाबाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी पत्रकार विक्रांत गुप्ता यांच्याबरोबर इन्स्टाग्राम चॅट दरम्यान ही स्पर्धा रद्द करण्यात आली असल्याचेगांगुली म्हणाले, पण याबाबत आशियाई क्रिकेट कौन्सिलकडून (ACC) अद्याप काहीही ऐकले नसल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डने म्हटले आहे. पीसीबी प्रवक्त्याने क्रिकेट पाकिस्तानच्या वृत्तानुसार म्हटले की, “एशिया कप टी-20 पुढे ढकलल्याबद्दल पीसीबीने एसीसीकडून काहीही ऐकले नाही.” बीसीसीआयने हे स्पष्ट केले होते की पीसीबीला अनुकूल असलेली विंडो भारतीय संघास अनुकूल नाही. (Asia Cup 2020 Cancelled: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आशिया चषक 2020 रद्द; बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांची घोषणा)

दरम्यान, पाकिस्तानी पत्रकार सज सादिक यांनी पीसीबीचे प्रमुख एहसान मनी यांचे म्हणणे आपल्या ट्विटरवर पोस्ट केले. मनी म्हणाले, "“आम्ही अजूनही आशिया चषक संदर्भात आशियाई क्रिकेट परिषद आमच्याकडे परत येण्याची वाट पाहत आहोत. ते विशिष्ट गोष्टींबद्दल चौकशी करत आहेत. कदाचित, सौरव गांगुलीला माहित असलेले काहीतरी मला माहित नसेल. परंतु आम्ही एसीसीकडून काहीही ऐकले नाही." दरम्यान, एसीसी अध्यक्ष नझमुल हसन यांनी अद्याप या विषयावर भाष्य केले नाही.

ट्विट

 

पाकिस्तान बोर्ड सप्टेंबर महिन्यात श्रीलंका किंवा संयुक्त अरब अमिरातीमध्ये(युएई) स्पर्धेचं आयोजन करण्याच्या विचारात होती, परंतू याच कालावधीत बीसीसीआय आयपीएलच्या आयोजन करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे, बीसीसीआयने पाकिस्तानी बोर्डाला पाकिस्तान सुपर लीगचे (पीएसएल) उर्वरित सामने पुढील वर्षी ढकलत नोव्हेंबरमध्ये आशिया चषक खेळवण्याची विनंती केली होती जी त्यांनी नकारत आयोजनावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला.