डेविड वॉर्नर (Photo Credit: @cricketcomau/Twitter)
मागील वर्षी दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध टेस्ट सामन्यात चेंडूशी छेडछाड करण्याच्या प्रकरणी दोषी म्हणून आढळलेल्या ऑस्ट्रेलियाची त्रिमूर्ती- स्टिव्ह  स्मिथ (Steve Smith), डेविड वॉर्नर (David Warner) आणि कॅमेरॉन बँक्रॉफ्ट (Cameron Bancroft) यांनी इंग्लंड (England) विरुद्ध अ‍ॅशेस (Ashes) मालिकेमधून संघात पदार्पण केले आहे. पहिल्याच अ‍ॅशेस टेस्ट सामन्यात प्रेक्षकांकडून या तिघांची टीका होत आहे. आणि ती अगदी टोकाला पोहचत आहे. बंदीनंतर टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या या तिघांना संशयाच्या दृष्टीने बघितले जात आहे. या टेस्टच्या पहिल्या दिवसांपासून मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी स्मिथला रडतानाचे मुखवटे दाखवत त्याला चिडवण्याच्या प्रयत्न केला. तसेच वॅार्नर व बॅनक्रॉफ्ट यांना बाद झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांची सॅण्ड पेपर दाखवून खिल्ली उडवली होती. (Vadodara Floods: बडोदा पूरग्रस्तांसाठी इरफान आणि युसूफ पठाण बनले मसीहा, अशा प्रकारे करताहेत मदत)
दरम्यान, या अ‍ॅशेस मालिकेच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा प्रेक्षकांनी वॉर्नरवर निशाणा साधला. मैदानावर क्षेत्ररक्षण करत असताना चाहत्यांनी वॉर्नरला प्रश्न विचारला की, 'खिशात सँडपेपर तर नाही ना. त्यावर वॉर्नरने हसतच त्याचे दोन्ही खिसे बाहेर काढून दाखवले.  दुसरीकडे, वॅार्नरला या सामन्यात एकदाही दुहेरी आकडाही पार करता आला नाही. पहिल्या इनिंगमध्ये त्याने 2 धावा तर दूसऱ्या इनिंगमध्ये 8 धावा केल्या. बॅनक्रॉफ्ट देखील काही प्रभावी केली करू शकला नाही.
ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या आणि दुसऱ्या इंनिंगमध्ये माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथच रक्षणकर्ता बनून आला. पहिल्या इंनिंगमध्ये स्मिथने 144 धावा केल्या होत्या. दुसऱ्या इनिंगमध्ये पहिले तिन्ही फलंदाज स्वस्तात बाद झाल्यावर स्मिथने धुरा आपल्या हाती घेतली. आणि ट्रेव्हिस हेड याच्या साथीने संघाचा डाव सावरला.