Ashes 2019: लॉर्ड्स टेस्टसाठी ऑस्ट्रेलियाचा 12 सदस्यीय संघ जाहीर; जेम्स पॅटिन्सन याला वगळले, मिशेल स्टार्क याचे पुनरागमन
मिशेल स्टार्क (Photo Credit: AP/PTI)

इंग्लंड (England) विरुद्ध दुसऱ्या अ‍ॅशेस (Ashes) टेस्टसाठी ऑस्ट्रेलियाने (Australia) 12 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये मिशेल स्टार्क, जोश हेजलवुड यांना स्थान मिळाले आहेत. तर, जेम्स पॅटिंसन याला विश्रांती देण्यात आली आहे. दुसरा सामना 14 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. याआधी इंग्लंड संघाने 12 सदस्यीय संघ जाहीर केला होता. यात फिरकीपटून मोईन अली याला डच्चू देण्यात आला तर डावखुरा फिरकीपटू जॅक लीच याचा समावेश करण्यात आला आहे. यजमान इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. त्यामुळे लॉर्ड्स कसोटीतून मालिका बरोबरीत सोडवण्याचा इंग्लंडचा निर्धार असेल. (Ashes 2019: जोफ्रा आर्चर-स्टिव्ह स्मिथ आणि अन्य खेळाडूंमधील लढाई आणेल लॉर्ड्स टेस्टमध्ये रंगत)

एजबॅस्टन येथे खेळण्यात आलेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) याने दोन्ही डावांमध्ये वर्चस्व राखत संघाच्या विजयात मोलाचा वाट निभावला. ऑस्ट्रेलियाचा रन-मशीन स्मिथने सलग डावांमध्ये दोन शतक झळकावले आणि विश्वविजेत्या इंग्लंडला धूळ चारली. याचबरोबर 5-सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी मिळवली. आत दुसऱ्या टेस्टमध्ये देखील स्मिथच्या कामगिरीवर सर्वांच्या नजर असतील. पण, त्याच्यासाठी आगामी टेस्ट सोप्पी नसणार. इंग्लंडने आपल्या 12 सदस्यांच्या संघात जोफ्रा आर्चर याला देखील स्थान दिले आहेत. आर्चर आणि स्मिथमधील लढत क्रिकेट प्रेमींसाठी मनोरंजक असणार आहे.

असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ: टीम पेन (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, कॅमेरून बँक्रॉफ्ट, उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हीस हेड, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, पीटर सिडल, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.

असा आहे इंग्लंडचा संघ: जो रूट (कॅप्टन), जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, सॅम कुरन, जोए डेन्ली, जऐक लीच, जेसन रॉय, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स.