इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघात अॅशेस (Ashes) मालिका रंगणार आहे. इंग्लंड-ऑस्ट्रेलियामधील अॅशेस मालिका 1 ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघातली ही परंपरागत मालिका दोन्ही संघासाठी महत्वाची आहे. त्यामुळे क्रिकेटमधील या ऐतिहासिक मालिकेत दोन्ही संघ आपली सर्व ताकद झोकून मैदानात खेळ करतात आणि त्यामुळे ही मालिका पाहणे या दोन देशांच्या क्रिकेटप्रेमीसांठी मोठी पर्वणीच असते. अॅशेस मालिकेतील एजबॅस्टन (Edgbaston) येथे पहिली टेस्ट सुरु होण्यापासून काही तासचं शिल्लक आहे. आणि दोन्ही संघ मैदानावर परिश्रम करताना दिसत आहे. पण ऑस्ट्रेलिया संघ एजबॅस्टन येथे प्रशिक्षण करण्यास आला तेव्हा येथे एक वेगळेच चित्र दिसले. (Ashes 2019: अॅशेससाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर; ॲलेक्स केरी ऐवजी मॅथ्यू वेड याला संधी, स्टिव्ह स्मिथ-डेविड वॉर्नर जोडी सुद्धा परतली)
विश्वचषक संपुष्टात येऊन अनेक दिवस उलगडले आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघ विश्वचषकच्या सेमीफायनलमध्ये आमने-सामने आले होते. यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने धुव्वा उडवत यजमान संघ फायनलमध्ये पोहचला होता. हा सामना देखील एजबॅस्टनच्या मैदानात खेळला गेला होता. दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघ जेव्हा अॅशेससाठी सराव करण्यासाठी येथे आला तेव्हा इंग्लंड-ऑस्ट्रेलियामधील त्या सामन्यातील अंतिम स्कोर येथे दर्शविला होता. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी (Jason Gillespie) याने पहिल्यांदा सर्वांच्या निदर्शनात आणून दिले. गिलेस्पीने ट्विट करत याची माहिती दिली.
Interesting decision by Edgbaston to keep this scoreboard up for the Aussie team for training today.....#ashes2019 pic.twitter.com/AyL2Jcmmqs
— Jason Gillespie 🌱🌈 (@dizzy259) July 29, 2019
दुसरीकडे, यंदाच्या अॅशेसदरम्यान टेस्ट क्रिकेटमध्ये यापूर्वी असे कधीच घडले नाही, अशा गोष्टी घडणार आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये प्रथमच सफेद जर्सीवर खेळाडूंची नावं आणि क्रमांक पाहायला मिळणार आहे. इंग्लंडने त्यांच्या ट्विटर हँडलवरून याची अधिकृत घोषणाही केली. पण, ऑस्ट्रेलियाकडून अद्याप असे कोणतेही ट्विट केले गेले नाही.