Steve Smith and David Warner (Photo Credit: Getty)

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात 1 ऑगस्ट पासून अ‍ॅशेस मालिका खेळली जाणार आहे. यंदाची अ‍ॅशेस इंग्लंडमध्ये खेळली जाणार आहे. यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 17- खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. यात चेंडूशी छेडछाड करण्याच्या आरोपात अडकेलेले ऑस्ट्रेलियाची त्रिमूर्ती स्टिव्ह स्मिथ (Stev Smith), डेविड वॉर्नर (David Warner) आणि कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट (Cameron Bancroft) यांना संघात स्थान देण्यात आले आहे. तर मिशेल मार्श (Mitchell Starc) आणि मॅथ्यू वेड (Matthew Wade) देखील संघात परतले आहे. वेड दोन वर्षांनी टेस्ट क्रिकेटमध्ये परत खेळताना दिसणार आहे. वेडला युवा खेळाडू ॲलेक्स केरी (Alex Carey) याच्या जागेवर संघात स्थान मिळाले आहे. (Ashes 2019: इंग्लंड-ऑस्ट्रेलिया अ‍ॅशेस दरम्यान टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदा जर्सीवर असणार खेळाडूंचे नाव आणि नंबर, पहा हे Photos)

दुसरीकडे, 2017 च्या ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात आलेल्या अ‍ॅशेस मालिकेत प्रभावी खेळी करणाऱ्या मिशेल मार्श याला देखील संधी देण्यात आली आहे. अपेक्षितेनुसार, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, जोश हेजलवूड आणि जेम्स पॅटिन्सन यांचा वेगवान गोलंदाजम्हणून समावेश करण्यात आला आहे. पीटर सिडल आणि मायकेल नेसर यांनाही निवडण्यात आले आहे.

दरम्यान, यंदाच्या अ‍ॅशेस मालिकेपासून टेस्ट क्रिकेटमध्ये आयसीसीकडून मोठा बदल करण्यात येणार आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये खेळाडू वेगळ्या जर्सीमध्ये पाहायला मिळणार आहे. यंदाच्या स्पर्धेपासून टेस्ट खेळाडूंच्या जर्सीवर नाव आणि नंबर लिहण्यात येणार आहे.

असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ:

टिम पेन (कॅप्टन), कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट, पॅट कमिन्स, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मिशेल मार्श, मॅथ्यू वेड, पीटर सिडल, मायकल नेसर, मार्नस लेबसचगने, नॅथन लिऑन, जेम्स पॅटिन्सन, स्टिव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर, आणि मिशेल स्टार्क.