Anushka Sharma to Sunil Gavaskar: सुनील गावस्कर यांच्या कमेंटवर भडकली अनुष्का शर्मा, म्हणाली 'माझे नाव वापरूनच तुमची प्रतिक्रिया पूर्ण होणार होती का?'
Anushka Sharma And Sunil Gavaskar (Photo Credits: Instagram)

IPL च्या 13 व्या सीजनमध्ये काल म्हणजेच 24 सप्टेंबर रोजी झालेल्या किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) सामन्यात Kings XI Punjab ने बाजी मारली. यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा लवकर आऊट झाला आणि त्याने दोन कॅचेसही सोडल्या. यावर टिप्पणी करताना प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी विराटची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिच्या नावाचाही उल्लेख केला. यामुळे नेटकरी चांगलेच भडकले असून यावर सोशल मिडियावर बरीच चर्चा होत आहे. त्यावर आता अनुष्का शर्मा हिने देखील इन्स्टाग्राम स्टेटसवर भला मोठा संदेश देत सुनील गावस्कर यांना सवाल विचारला आहे.

विराट कोहलीविषयी टिप्पणी करताना 'माझे नाव वापरूनच तुमची प्रतिक्रिया पूर्ण होणार होती का ? असा सवाल तिने विचारला आहे. आपल्या पतीच्या खेळासाठी तुम्ही त्याच्या पत्नीवर आरोप लावण्याचा विचार का केला? मला माहित आहे तुम्ही इतकी वर्ष कॉमेंट्री देत आहात मात्र आतापर्यंत तुम्ही प्रत्येक क्रिकेटरच्या खाजगी आयुष्याचा सम्मान केलात तसच तुम्ही आमच्या खाजगी आयुष्याच्या सम्मान ठेवणे गरजेचे नव्हते का? असा सडेतोड प्रश्न अनुष्काने विचारला आहे. IPL 2020: KXIP vs RCB सामन्यात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा वर सुनील गावस्कर यांनी केलेल्या टिप्पणीवरुन नेटकरी भडकले (See Posts)

Anushka Sharma Comment (Photo Credits: Instagram)

माझ्या पतीच्या प्रदर्शनाविषयी कमेंट करताना तुमच्या मनात अधिक वाक्य, शब्द आले असतील तर माझ्या नावाने ते पूर्ण होणार होते असे तुम्हाला वाटत का? असेही तिने विचारले आहे.

विरुष्काच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणे अत्यंत चुकीचे आहे, असे काहींचे म्हणणे आहे. तर काही गावस्कर यांना कॉमेंटरी पॅनलवरुन काढून टाकण्याच्या मागणी बीसीसीआयकडे करत आहेत. तसंच विराटच्या कामगिरीवरुन अनुष्काला बोल लावणे यातून भारतीय मीडियाची मानसिकता दिसून येत असल्याचेही काहींचे म्हणणे आहे.