फिरोजशाह कोटला स्टेडियमचे (नाव अधिकृतपणे अरुण जेटली स्टेडियम असे करण्यात आले. यासह, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या नावावर स्टेडियममध्ये एक स्टॅन्डचे अनावरण करण्यात आले. या दरम्यान कोहली सह कुटुंब आणि पत्नी अनुष्का शर्मा देखील हजर होती. या कार्यक्रमादरम्यानचा विराट-अनुष्काचा एक व्हिडिओही समोर आला आहे आणि सोशल मीडियात तो सध्या व्हायरल होत आहे. नुकताच विराटने अनुष्कासोबतचा वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यानचा एक फोटो शेअर केला जो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा फोटो चाहत्यांसह तसेच सेलेब्रिटींनाही खूप आवडला होता. दुसरीकडे, या कार्यक्रमात भारतातील सर्वात जुन्या स्टेडियममधील ऐतिहासिक फिरोजशाह कोटला स्टेडियमचे नाव आता अरुण जेटली स्टेडियम असे करण्यात आले. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (डीडीसीए) गुरुवारी जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आपल्या माजी अध्यक्षचा सन्मान करण्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गृहमंत्री अरुण जेटली आणि क्रीडामंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत नवीन नामकरण सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी-20 सामन्यांसाठी निवडलेल्या भारतीय संघातील सर्व सदस्य या सोहळ्यात उपस्थित होते. (फिरोज शाह कोटलाच्या आठवणीत रमला विराट कोहली, जवागल श्रीनाथ चे ऑटोग्राफ मिळवण्यासाठी केले होते 'हे' काम)
सोशल मीडियात वैराळ झालेल्या या व्हिडिओमध्ये अनुष्का आणि विराटने एकमेकांचा हात दाराला आहेत आणि त्यानंतर अनुष्का विराटच्या हातावर किस करतेय. यानंतर, दोघे बोलताना आणि हसताना दिसताहेत. पहा हा रोमँटिक व्हिडिओ:
View this post on Instagram
Love 💕 . . . #viratkohli #anushkasharma #virushka #viratanushka #virushkaforever #virat #anushka
काही दिवसांपूर्वी विराटने अनुष्काशी झालेल्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले. अमेरिकन टेलिव्हिजन स्पोर्ट्स रिपोर्ट ग्रॅहम बेन्सिंजरला दिलेल्या मुलाखतीत विराटने सांगितले की, जेव्हा तो अनुष्काला पहिल्यांदा भेटला तेव्हा तो खूप घाबरला होता. त्याने त्याचा हुरहूरपण दूर करण्यासाठी एक जोक सुनावला कारण मला काय करावे हे त्याला समजले नाही. विराट आणि अनुष्का एका शॅम्पूच्या ऍड शूट दरम्यान पहिल्यांदा भेटले होते. याबद्दल अजून सांगताना विराटने सांगितले की या चमत्कारिक प्रारंभानंतर शूट 3 दिवस चालले, ज्यामुळे दोघांमध्ये छान संवाद झाला. यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर हळूहळू त्यांच्या नात्यात प्रगती झाली.