असा क्रिकेटर होणे नाही! भारताचे 'हे' 3 जखमी क्रिकेटपटू जेव्हा टीम इंडियाला विजय मिळवून देण्यासाठी मैदानावर उतरले
अनिल कुंबळे (Photo Credit: Getty)

Memorable Comeback By Injured Cricketers: दुखापत हा प्रत्येक खेळाचा एक अविभाज्य भाग आहे. क्रिकेटपटूही (Cricket) याला अपवाद नाही. अनेक क्रिकेटपटूंना आत्तापर्यंत सामना सुरु असताना दुखापतींचा त्रास सहन करावा लागला आहे. पण, असे असले तरी असे काही क्रिकेटपटू आहेत ज्यांनी सामना सुरु असताना जखमी असूनही संघहिताला प्राधान्य दिले आणि मैदानात उतरुन संघाला विजय मिळवून दिला. सामन्यादरम्यान मोडलेला जबडा, बोट, मनगट किंवा हॅमस्ट्रिंगसह खेळपट्टीवर परतणे क्रिकेटपटूंसाठी सोप्पे नसते. यापैकी बर्‍याच प्रकरणांमध्ये क्रिकेटपटू मागे राहून स्वत:चा बचाव करणे निवडतात. तथापि, अगदी काही थोड्या क्रिकेटपटूंनी धाडस दाखवले आणि मैदानावर परतले. त्यांच्या कमबॅकने संघाला मोठा दिलासा मिळाला. (अबब! टीम इंडियाच्या 'या' 5 फलंदाजांनी कसोटी क्रिकेटच्या एका डावात खेळले सर्वाधिक बॉल्स, 'हा' टेस्ट स्पेशलिस्ट खेळला 525 चेंडू)

अशाच काही क्रिकेटपटूंचा या लेखात आढावा घेणार आहोत ज्यांनी दुखापतग्रस्त झाल्यानंतर क्रिकेट मैदानावर परत येत क्रिकेटपटूंनी देशप्रेम दाखवले.

1. केदार जाधव (एशिया कप फायनल 2018)

दुबई येथे झालेल्या आशिया चषक 2018 फायनलमध्ये बांग्लादेशविरुद्ध भारताच्या विजयात अष्टपैलू केदार जाधवने त्याच्या आतापर्यंतच्या छोट्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील सर्वात महत्त्वपूर्ण खेळी साकारली आहे. बांग्लादेशने 222 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांग्लादेशी गोलंदाज नियमित अंतराने भारतीय विकेट घेत राहिल्याने संघाच्या विजयावर संशय निर्माण होऊ लागला. या दरम्यान, जाधव फलंदाजी आला. दुखापतीतून सावरल्यानंतर आशिया कपमधून कमबॅक करणाऱ्या जाधवने मिडविकेटवर शॉट मारत चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण या दरम्यान त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. संघाचा फिजिओ पेट्रिक फरहार्टने त्याच्यावर मैदानावर उपचार केले ज्यानंतर त्याने फलंदाजी सुरूच ठेवली, मात्र काही वेळाने त्याला मैदान सोडावे लागले. भारतीय संघ विजेतेपदासाठी 223 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करीत होता आणि जडेजाची विकेट पडल्यावरलंगडी घाल जाधवला पुन्हा एकदा मैदानावर परतला. जाधवने संयमी खेळी केली आणि सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर वेगाने अखेरची धाव घेत भारतासाठी सातव्यांदा आशिया कपचे विजेतेपद पटकावले.

2. सौरव गांगुली (भारत विरुद्ध श्रीलंका, 2006)

राहुल द्रविडकडे कर्णधारपद गमावल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीसाठी हा इतका चांगला काळ नव्हता. शिवाय, गांगुली एका लिंबोमधून बरे होत होता. पहिले फलंदाजी करत श्रीलंकेने भारताविरुद्ध 259 धावांपर्यंत मजल मारली. या दरम्यान, गांगुलीच्या बरगंडीला दुखापत झाली ज्यामुळे त्याने मैदाना बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने 110 धावांवर दोन विकेट गमावल्यावर गांगुली खेळपट्टीवर परतला. धाव घेण्याच्या गोंधळात सेहवाग रनआऊट झाला. त्यानंतर गांगुली आणि युवराजमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 145 धावांची भागीदारी झाली. वेदना होत असूनही गांगुलीने अतिशय शांत डोक्याने प्रभावी खेळी केली आणि संघाचा विजय निश्चित केला.

3. अनिल कुंबळे (अँटिगा, 2002)

वेस्ट इंडिजच्या 2002 दौऱ्यावरील अँटिगा कसोटीत कुंबळेची 'जम्बो' खेळी क्रिकेट चाहते कदाचितच विसरू शकतील. या सामन्यात कुंबळेचा जबडा तुटला होता. पण तरीही त्याने गोलंदाजी केली होती. सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना मार्वन ढिल्लनचा चेंडू कुंबळेच्या जबड्याला लागला. रक्त येत असतानाही कुंबळेने फलंदाजी केली. पण, पहिला डाव संपल्यावर कुंबळेच्या जबड्याला फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाले. ज्यामुळे त्याला उर्वरित मालिकेतून बाहेर पडावे लागणार होते. असे असतानाही सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याने गोलंदाजी करण्यासाठी उतरण्याचा निर्णय घेतला. त्यादिवशी जबडा हलणार नाही याची काळजी घेण्यासाठी बँडेज बांधले आणि गोलंदाजी केली. कुंबळेने तब्बल 14 ओव्हर गोलंदाजी केली आणि विंडीजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराची विकेटही घेतली होती. कुंबळे संघाला विजय मिळवून देऊ शकला नसला तरी त्याची धाडसी खेळी आजच्या चाहत्यांच्या स्मरणात आहे. भारत-वेस्ट इंडिजमधील तो सामना बरोबरीत सुटला होता.