Photo Credit- X

माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli )गेल्या काही दिवसांपासून त्याच्या प्रकृतीच्या समस्येमुळे चर्चेत आहेत. उपचारादरम्यान डॉक्टरांना त्यांच्या मेंदूत गुठळ्या आढळून आल्या. विनोद कांबळी याला आता रुग्णालयातून सोडण्यात आले. नुकतीच कांबळी याने त्याच्या पत्नीसह वानखेडे स्टेडीयमला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. आता माजी क्रिकेटपटूची पत्नी अँड्रिया हेविटने (Andrea Hewitt) त्यांच्या संसारात आलेल्या अडचणी, घटस्फोट आणि मुलांचा मिळालेला पाठिंबा यावर भाष्य केलं. 2023 मध्ये अँड्रिया यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता परंतु नंतर तो मागे घेतला असे उघड केले.

Vinod Kambli आणि Andrea Hewitt यांचाही थोडक्यात वाचला संसार

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Suryanshi Pandey (@suryanshi_pandey)

अँड्रिया हिने पुढे म्हटले मी संकटात असलेल्या मित्रालाही सोडत नाही, त्यामुळे हा (विनोद कांबळी) माझ्यासाठी मित्रापेक्षा जास्त आहे. मला वाटले की विनोद माझ्याशिवाय कसा जगेल. मला वाटते की तो माझा मुलगा आहे. मी त्याला सोडू शकत नाही. त्याच्या समस्या पाहून मला खूप वाईट वाटते. मी तेव्हा निघून गेले होते पण प्रत्येक वेळी तो कसा आहे. त्याने नीट खाल्ले आहे की नाही. बेडवर आरामात झोपता येते की नाही. म्हणून मी परत गेले तेव्हा त्याची अवस्था पाहून मला समजले की त्याला माझी गरज आहे. त्यामुळे घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर तो मागे घेतला होता.(Vinod Kambli Struggles to Walk: विनोद कांबळीला चालताही येत नव्हते; पत्नी अँड्रियाच्या 'त्या' कृतीने जिंकली अनेकांची मने (Watch Video))

मुलाखतीत त्याच्या कांबळी याचा मुलगा क्रिस्टियानो यानेही तेव्हा परिस्थितीवर भाष्य केलं. साधारण ४ वर्षांचा असताना घरची परिस्थिती समजल्यावर तो अँड्रिया आणि विनोद कांबळी यांची काळजी घेऊ लागला. त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची नेहमीच काळजी घेतली. विशेषत: आईच्या मानसिक आरोग्याची काळजी घेत होता. दोघांना औषधे वेळेवर देणे. घरात हातभार लावणे अशी कामे तो करत होता. त्