आंद्रे रसल याच्या घरी येणार लहान पाहुणा, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ
Andre Russell And Jassym Lora (Instagram)

वेस्टइंडीज संघाचा तडाखेबाज फलंदाज आंद्रे रसल (Andre Russell) याच्या घरी लहान पाहुणा येणार आहे. रसलने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामच्या (Instagram) अकांउटवरुन याबाबतची माहीती दिली आहे. आंद्रे रसल हा पहिल्यांदाच बाप बनणार आहे. या निमित्ताने रसलने त्याच्या घरी एक कार्यक्रम ठेवला आहे. प्रथमच बाप बनण्याचा आनंद त्याने हटक्या स्टाईलने साजरा केला आहे. दरम्यान, त्याने पत्नी जैसन लॉरा (Jassym Lora) सोबत एक व्हिडिओ काढून इंस्टाग्रामच्या अकांउटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला हजारो इंस्टाग्राम वापरकर्त्यांनी पसंती दाखवली आहे.

आंद्रे रसलने प्रथम बाप बनण्याचा आनंदात त्याने बेबी रसल या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात रसलने त्याच्या मित्रांनाही सहभागी करुन घेतले आहे. आंद्रे रसलने त्याच्या अधिकृत ट्विटर अकांउटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडिओत रसल हातात बॅट घेऊन उभा आहे, तर जैसन हिने तिच्या हातात बॉल घेतल्याचे दिसत आहे. या व्हिडिओला १ लाख ५० हून अधिक लोकांनी पसंती दाखवली आहे. हजारांच्या जवळपास लोकांनी यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. हे देखील वाचा- Ashes 2019: स्टिव्ह स्मिथ याने सुनील गावस्कर यांच्या 49 वर्ष जुन्या रेकॉर्डची केली बरोबरी, वाचा सविस्तर

आंद्रे रसलकडून शेअर केलेला व्हिडिओ-

आंद्रे रसल हा नेहमी फलंदाजीच्या जोरावर प्रेक्षकांचे मन जिंकत आला आहे. भारतीय प्रिमियर लीगमध्ये आंद्रे रसल कोलकाताच्या संघाकडून खेळतो. गेल्या आयपीएलमध्ये रसलच्या जोरावर अनेक सामन्यात विजय मिळवला होता.