अमिताभ बच्चन (Photo Credits: Stock Photos)

क्रिकेट विश्वचषकच्या फायनल सामन्यात यजमान इंग्लंड (England) संघानी न्यूझीलंड (New Zealand) संघाचा सुपर-ओव्हरमध्ये पराभव करत पहिल्यांदा विश्वचषसक जिंकण्याची कामगिरी केली आहे. इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातील सामना टाय झाला. दोन्ही संघांनी निर्धारीत ओव्हरमध्ये 241 धावा केल्या. त्यानंतर सुपर-ओव्हरमध्ये इंग्लंडने एका ओव्हरमध्ये 15 धावा काढल्या. न्यूझीलंडला विजयासाठी 16 धावांची गरज होती मात्र, त्यांनादेखील 15 च धावा करता आल्या आणि सुपर-ओव्हर देखील टाय झाली. अखेर, इंग्लंड संघ जास्त बाऊंड्रीच्या आधारावर विजयी झाला. यावर कित्येक चाहते, तज्ञ यांनी आपली निराशा व्यक्त केली आहे. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी देखील इंग्लंडच्या विजयानंतर आयसीसी (ICC) ला धारेवर धरले आहे. (ENG vs NZ, World Cup 2019 Final: इंग्लंड संघाला विजयाचा मान दिल्याने आईसीसी वर्ल्डकपच्या नियमांवर प्रश्नचिन्ह; गौतम गंभीर, युवराज सिंग आणि रोहित शर्मा यांनी व्यक्त केले मत)

बच्चन यांनी आपल्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत आयसीसीच्या नियमांची खिल्ली उडवत त्याच्यावर टीका केली आहे. बच्चन ट्विट करत म्हणाले, "आपल्याकडे 2000 रुपये आहेत, माझ्याकडे 2000 रुपये आहेत, आपल्याकडे 2000 ची नोट आहे, माझ्याकडे 500 पैकी 4 नोट्स आहेत, सर्वात श्रीमंत कोण? आयसीसी - त्याच्याकडे 500 पेक्षा जास्त नोट्स श्रीमंत आहेत." अजून एक ट्विटकरत बच्चन म्हणाले, "म्हणूनच आई म्हणायची की 'चौका' मारायला यायला पाहिजे".

दरम्यान, यंदाचा विश्वचषक इतर काही घटनांसाठी देखील कायम लक्षात राहिलं. या स्पर्धेत खलनायक ठरलेला पाऊस, एम एस धोनीच्या ग्लोव्हजवरुन उठलेले वादळ, अंपायरचे वादग्रस्त निर्णय, काही विक्रमी खेळी, खेळाडूंची सुरक्षितता अशा काही घटना क्रिकेप्रेमींच्या कायम स्मरणात राहतील.