भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे (India tour of West Indies 2023), जिथे 12 जुलैपासून कसोटी मालिका खेळवली जाईल. यानंतर 3 सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. वनडे आणि कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे, तर टी-20 (IND vs WI T20 Squad 2023) साठी संघ अजून यायचा आहे. सध्या टी-20 संघाच्या अनुपस्थितीचे एक कारण म्हणजे बीसीसीआयच्या मुख्य निवडकर्ता पदाची रिक्त जागा. मात्र मंगळवारी बीसीसीआयने नवा मुख्य निवडकर्ता म्हणून अजित आगरकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. विंडीज दौऱ्यासाठी टी-20 संघ निवडणे हे आगरकरचे पहिले काम असेल.
आयपीएलमध्ये छाप पाडणाऱ्या खेळाडूंचा होवू शकतो समावेश
वेस्ट इंडिजविरुद्धची पाच सामन्यांची टी-20 मालिका खूप महत्त्वाची आहे, ती पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकाची तयारी म्हणूनही पाहिली जाऊ शकते. आयपीएलमध्ये छाप पाडणाऱ्या खेळाडूंचा या मालिकेत समावेश करावा, अशी बीसीसीआयची इच्छा आहे. 3 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा पुढील आठवड्यात होऊ शकते. (हे देखील वाचा: IND vs WI Test Series 2023: एवढ्याच धावा करताच विराट कोहली रचणार इतिहास, सेहवाग आणि शास्त्रीला टाकणार मागे)
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना मिळू शकते विश्रांती
मिळालेल्या माहितीनुसार, वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे देण्यात येणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माला टी-20 मधून विश्रांती दिली जाऊ शकते. मोहम्मद शमीला टी-20 साठी बोलावले जाऊ शकते, कारण शमीचा कसोटी आणि एकदिवसीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांचाही टी-20 संघात समावेश होऊ शकतो. आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीने छाप पाडणाऱ्या ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, जितेश शर्मा, रिंकू सिंग यांचा संघात समावेश करण्याबाबत विचार केला जात आहे.