Ajinkya Rahane (Photo Credit - X)

Ajinkya Rahane: मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने खणखणीत शतक झळकावलं आहे. हरियाणा-मुंबई रणजी ट्रॉफी 2024-25 (Ranji Trophy 2024-25) च्या क्वार्टर फायनल सामन्यात त्याने ही कामगिरी केली. अजिंक्य रहाणे याने 160 चेंडूत 12 चौकारांच्या साथीने मुंबईला हरियाणाविरुद्ध चांगली आघाडी दिली आहे. विशेष म्हणजे, मुंबई विरुद्ध हरियाणा सामना हा अजिंक्य रहाणेचा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 200 वा सामना आहे. रहाणेच्या या शतकामुळे मुंबई मजबूत स्थितीत पोहचली आहे. (Kane Williamson Milestone: केन विल्यमसनने 6 वर्षांनंतर एकदिवसीय शतक ठोकले,विराट कोहलीला मागे टाकून इतिहास रचला)

मुंबईने 300 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली आहे. मुंबईने 48 धावांवर दुसरी विकेट गमावली. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे मैदानात आला. त्यानंतर सिद्धेश लाड आणि रहाणे या तिघांनी तिसऱ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. त्यानंतर सिद्धेश 43 धावा करुन आऊट झाला. रहाणेने त्यानंतर सूर्यकुमार यादव याच्यासह मुंबईचा डाव सावरला.

अजिंक्य रहाणेने 41 वे शतक झळकावले

रहाणे आणि सूर्यकुमार यादव या जोडीने चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. अजिंक्य आणि सूर्यकुमार या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 129 धावांची भागीदारी केली. सूर्याने 86 बॉलमध्ये 70 रन्स केल्या. सू्र्यानंतर शिवम दुबे मैदानात आला. शिवमने अजिंक्यला चांगली साथ दिली.

दोन्ही संघांचे खेळाडू

हरियाणा प्लेइंग इलेव्हन : अंकित कुमार (कर्णधार), लक्ष्य दलाल, यशवर्धन दलाल, हिमांशू राणा, निशांत सिंधू, रोहित परमोद शर्मा (विकेटकेपर), जयंत यादव, सुमित कुमार, अंशुल कंबोज, अनुज ठकराल आणि अजित चहल.

मुंबई प्लेइंग इलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, आकाश आनंद (विकेटकीपर), सिद्धेश लाड, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, शम्स मुलानी, शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, मोहित अवस्थी आणि रॉयस्टन डायस.